Latest

Omicron : ‘ओमायक्रॉन’चे दोन रुग्ण सापडल्यानंतर कर्नाटक अलर्टवर, तातडीची बैठक बोलावली

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि त्यांचे सहकारी आणि आरोग्य तज्ज्ञांसह बैठक घेणार आहेत. आणि Omicron च्या धोक्याला कसे सामोरे जावे यावर चर्चा करणार आहेत. ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण कर्नाटकात आढळून आल्याने, ओमायक्रॉनने राज्याचे दार ठोठावलेले आहे. ते देशातील पहिले राज्य ठरले आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे डीन आणि वैद्यकीय अधीक्षक यांची बैठक घेऊन नियोजन करणार आहेत. राज्यात अनेक विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहेत.

मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेसमध्ये चाचणी केल्यानंतर केंद्राला कर्नाटकातील दोन नमुन्यांमध्ये ओमायक्रॉन संसर्ग आढळला आहे. सविस्तर अहवाल लवकरच येईल, असे ते म्हणाले.

बोम्मई म्हणाले, "मी आरोग्य मंत्री आणि मुख्य सचिवांना तपशीलवार अहवाल मिळविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तज्ज्ञ आणि वरिष्ठ अधिकार्‍यांसह तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री आरोग्य कर्मचार्‍यांना कोविड-19 लसीचे बूस्टर डोस देण्याची शक्यता देखील तपासत आहेत.

दोन रूग्णांपैकी एक बंगळूर येथील 46 वर्षीय डॉक्टर आहे ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले होते, त्यांचा प्रवासाचा इतिहास नव्हता, परंतु 21 नोव्हेंबर रोजी ताप आणि अंगदुखीची दिसत होती.

कर्नाटकात 'ओमायक्रॉन'चा शिरकाव

दोन रुग्णांपैकी एकजण गेल्या तीस वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेत राहतो. व्यापारानिमित्त त्याचे भारत आणि आफ्रिकेत येणे- जाणे असते. आणखी एक रुग्ण बंगळूरचा असल्याचे केंद्र सरकारने कळवले आहे. दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण बंगळुरातील स्टार हॉटेलमध्ये उतरला होता. तो 211 जणांच्या प्राथमिक आणि दुय्यम संपर्कात आला होता. दोन रुग्णांपैकी एकजण दक्षिण आफ्रिकेला परतला आहे. दुसर्‍या रुग्णावर बंगळुरात उपचार केले जात आहेत.

कर्नाटकात खबरदारी ओमायक्रॉनचे दोन रुग्ण कर्नाटकात आढळल्याने राज्य शासनाने व्यापक खबरदारी घेतल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वत्थनारायण यांनी दिली. येथे ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, रुग्णांची तपासणी करून उपचार केले जात आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. त्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे. या विषाणूवर नियंत्रण ठेवण्यासाठी अभ्यास केला जात आहे. हा विषाणू वेगाने पसरतो. प्रयोगशाळेला जिनोम सिक्वेन्स पाठवण्यात आले होते. या विषाणूमुळे गंभीर आजार होत नाही.

हेही वाचलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT