Latest

Omicron : ओमिक्राॅन ठरू शकतो कोरोनाविरुद्ध गुड न्यूज

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या व्हॅरियंटमुळे जगभरात चिंता व्यक्त होत असून, काही देशांत लॉकडाऊन आणि प्रवासावरही निर्बंध आणले जात आहेत; पण प्रत्यक्षात हा व्हॅरियंट तितकी वाईट बातमी ठरणार नाही, असं म्हटलं जात आहेत. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेले या व्हॅरियंटचे रुग्णांना अगदी सौम्य स्वरुपाचा कोरोना झालेला, असे वृत्त आहे.

काही तज्ज्ञांचं असं मत आहे की, ओमिक्रॉन (Omicron) हा अत्यंत वेगाने प्रसारित होतो, याचा अर्थ घातक अशा डेल्टा व्हॅरियंटची जागा ओमिक्रॉन घेईल, त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू होण्याचा धोका कमी झालेला असेल. दक्षिण आफ्रिकेतील ज्या डॉक्टरने पहिल्यांदा ओमिक्रॉन या व्हॅरियंटची शंका व्यक्त केली त्यांनी म्हटलं आहे की जे रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यातील लक्षणं अत्यंत सौम्य असून त्यावर घरीसुद्धा उपचार होऊ शकतात. डॉ. अँजेलिक क्वॉटजी असे या डॉक्टरचे नाव आहे. साऊथ आफ्रिकन मेडिकल असोसिएशनचे ते अध्यक्षही आहेत.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेला त्यांनीही माहिती दिली आहे. डॉ. अँजेलिक व्हॅक्सिनेशन समितीवरही कार्यरत आहेत. ते म्हणाले, "आतापर्यंत जे रुग्ण आढळून आले आहेत, त्यांच्यात ऑक्सिजनची पातळी फार खालवलेली नाही, तसे ते वासही घेऊ शकतात." जे रुग्ण आढळून आलेत ते ४० किंवा त्यापेक्षा कमी वयाचे आहेत. सुरुवातीला एक दोन दिवस प्रचंड थकवा आणि शरीरात वेदना अशी लक्षणं प्रामुख्याने दिसून आली आहेत.

विषाणूजत्ज्ञ मार्क व्हॅर रॅन यांनी म्हटलं आहे की, या व्हॅरियंट वेगाने पसरत आहे, पण याची पॅथोजेनिक क्षमता कमी आहे. म्हणजेच तो डेल्टा व्हॅरियंटची जागा घेऊ शकतो.  इस्राएलमधील हडसाह युनिव्हर्सिटीतील हॉस्पिटल इन करेमचे कोरोना व्हायरस विभागाचे प्रमुख डॉ. डॉर मिझोरॅक म्हणाले नव्या व्हॅरिएंटची लागण ज्यांना होत आहे, त्यांच्या प्रकृतीची स्थिती चांगली आहे. अशाच प्रकारची स्थिती राहिली तर डेल्टाच्या तुलनेत आपल्याला सौम्य आजार होईल, आणि ते जगभरातील साथीलशी लढनं सोपे जाईल.

जागतिक आरोग्य संघटनेने मात्र हा व्हॅरियंट समजून घेण्यासाठी अजून काही दिवस लागतील, असं स्पष्ट केलं आहे. अमेरिकेतील सूक्ष्मजीवशास्त्रतज्ज्ञ प्रो. कॉलम सेंपल यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीत नवीन व्हॅरिएंट फार मोठं संकट नाही असं म्हटलेलं आहे. व्हॅक्सिनमुळे या व्हॅरियंटपासून संरक्षण मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का ?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT