Latest

Oil prices | इस्राईल- हमास युद्धाची आशियाई बाजाराला झळ! तेलाचे दर भडकले

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन : इस्राईल आणि हमास (Israel-Hamas war) यांच्यातील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर भडकले आहेत. आशियाई बाजारात सोमवारी सुरुवातीच्या व्यवहारात तेलाच्या किमती प्रति बॅरल ४ डॉलर पेक्षा जास्त वाढल्या. इस्राईल आणि हमास दहशतवादी यांच्यातील लष्करी संघर्षांमुळे मध्य पूर्वेतील राजकीय अनिश्चितता अधिक वाढली. याचा परिणाम आशियाई बाजारातील तेलावर झाला आहे. (Oil prices)

संबंधित बातम्या

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, आज ब्रेंट क्रूड ४.१८ डॉलर म्हणजेच ४.९४ टक्के वाढून प्रति बॅरल ८८.७६ डॉलरवर गेले आहे. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ४.२३ डॉलर म्हणजेच ५.११ टक्के वाढून प्रति बॅरल ८७.०२ डॉलरवर पोहोचले.

तेलाच्या किमतीतील वाढीमुळे गेल्या आठवड्यातील घसरणीचा ट्रेंड बदलला आहे. गेल्या आठवड्यातील घसरणी ही मार्चनंतरची सर्वात मोठी साप्ताहिक घसरण होती. ज्यामध्ये ब्रेंट सुमारे ११ टक्क्यांनी घसरले. तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड ८ टक्क्यांहून अधिक घसरले होते. उच्च व्याजदर आणि जागतिक मागणीवरील त्यांच्या प्रभावाच्या चिंतेमुळे तेलाचे दर गेल्या आठवड्यात घसरले होते. (Israel-Hamas conflict) पण आता हे दर वाढले आहेत.

पॅलेस्टिनी इस्लामी गट हमासने शनिवारी इस्राईलवर दशकांतील सर्वात मोठ्या लष्करी हल्ल्याला सुरूवात केली. हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या मोठ्या हल्ल्यात इस्राईल आणि गाझामधील सुमारे १ हजार लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. गाझामधील हवाई हल्ल्यांमुळे १ लाख २३ हजार पॅलेस्टिनी विस्थापित झाले आहेत आणि ते जवळपास ७४ हजार शाळांमध्ये सुरक्षित आश्रय शोधत आहेत, असे संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले आहे.

"मध्य पूर्वेतील भौगोलिक-राजकीय जोखीम वाढल्याने तेलाच्या दरावर त्याचा परिणाम दिसून येईल. यामुळे तीव्र स्वरुपाची अस्थिरता निर्माण होऊ शकते" असे ANZ बँकेच्या विश्लेषकांनी क्लायंट नोटमध्ये म्हटले आहे.

या युद्धामुळे सौदी अरेबिया आणि इस्राईल यांच्यात सामंजस्य निर्माण करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्नांना खीळ बसण्याचा शक्यता आहे. ज्यामध्ये अमेरिका आणि सौदी यांच्यातील संरक्षण कराराच्या बदल्यात सौदी अरेबिया इस्राईलशी संबंध सामान्य करणार होते.

सौदी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी व्हाईट हाऊसला सांगितले होते की ते प्रस्तावित इस्राईल कराराचा भाग म्हणून ते पुढील वर्षी उत्पादन वाढवण्यास इच्छुक आहेत. सौदी अरेबिया आणि रशिया या प्रमुख तेल उत्पादकांनी पुरवठ्यात कपात केल्यानंतर सौदीने उत्पादनात वाढ केली आहे. यामुळे पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली होती. (Oil prices)

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT