Latest

दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात ऑफर्सचा पाऊस

गणेश सोनवणे

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल वाढली असून, आकर्षक सवलती आणि कॅशबॅक सुविधांमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपडेट टेक्नॉलॉजी असलेल्या वस्तूंना मोठी मागणी असून, कर्ज सुविधांमुळे या वस्तू खरेदी करणे सहज शक्य होत आहे.

डबल डोअर फ्रीज, वॉशिंग मशिन, टीव्ही, डिश वॉशरची खरेदी केली जात आहे. त्यात ओव्हन, फूड प्रोसेसर आदी वस्तूंना मागणी आहे. खरेदीवर ७० टक्क्यांपर्यंत सूट, २० टक्क्यांपर्यंत कॅशबॅकमुळे ग्राहक इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर भर देत आहेत. बहुतांश विक्रेत्यांनी 'लकी ड्रॉ'देखील उपलब्ध करून दिल्याने वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. लकी ड्रॉ मध्ये चारचाकीपासून ते दुचाकी, ५५ इंची एलईडी टीव्ही उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची एकच झुंबड बघावयास मिळत आहे. त्यातच ईएमआयमुळे महागड्या किमतीचे फोन, लॅपटॉप तसेच इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेणे सहज शक्य होताना दिसत आहे.

बाय वन गेट वन फ्री ही आॅफरदेखील ग्राहकांना मोहात पाडताना दिसत आहे. दरम्यान, नवी वस्तू दिवाळीच्या मुहूर्तावर घरी आणता यावी, असाही अनेकांचा प्रयत्न दिसून येत आहे. त्यासाठी बुकिंग आणि कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. गुरुवार (दि.९)पासून दिवाळीला प्रारंभ होत असून, मुहूर्तांवर वस्तू घरी आणण्यासाठी अनेकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, ग्राहकांच्या वाढत्या प्रतिसादामुळे व्यापारीवर्ग सुखावला आहे.

वर्ल्ड कप फीव्हर

सध्या क्रिकेट विश्व करंडक स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे अगदी ३२ इंचापासून ते ८५ इंचापर्यंत एलईडी टीव्ही खरेदीसाठी ग्राहक उत्सुक आहेत. त्यांच्या किमती दहा हजार रुपयांपासून ते एक लाखापर्यंत आहेत. वर्ल्ड कपमधील सेमिफायनल आणि फायनलचे सामने बाकी असल्याने अन् भारतीय संघाच्या सर्वोत्तम कामगिरीमुळे घरबसल्या मोठ्या स्क्रीनवर पुढील सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या स्क्रीन असलेल्या एलईडी टीव्ही खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

या गॅझेट्सना मागणी

– स्मार्ट वॉच, स्मार्ट बँड
– पोर्टेबल ब्लूटुथ स्पीकर
– हेडफोन्स किंवा इअर पॉड्स
– गेमिंग ॲक्सेसरीज
– मोबाइल, टॅब
– स्मार्ट स्पीकर (एलेक्सा, गुगल

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT