Pune news : भोरला काढणीस आलेल्या भाताला अवकाळीचा फटका | पुढारी

Pune news : भोरला काढणीस आलेल्या भाताला अवकाळीचा फटका

भोर : पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून भात काढणीची लगबग सुरू असताना बुधवारी (दि. 8) सकाळी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावून भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केलेले आहे. परिणामी, याचा फटका भात पिकांच्या तुरंब्यावर झाला असून, मोठ्या प्रमाणात खाचरातून भात पिकाची गळती झालेली असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
भोर तालुक्यात सकाळपासून  ढगाळ  वातावरण तयार झाले असताना   वाईच्या दिशेने तालुक्याच्या दक्षिण भागात  अवकाळी पावसाने हजेरी लावून  काढणीस  आलेली हळव्या जातीच्या भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.  गरव्या  भात पिकांची  लोळवण झाली असून,  तुरंब्याच्या  भाताची मोठी गळती झालेली आहे.  हवेत ढगाळ वातावरण असल्यामुळे  शेतकरीवर्ग सकाळीच  आपल्या शेतात जाऊन काढून ठेवलेल्या भात पिकाची जमवाजमव  करत असताना मोठी लगबग करत होता; परंतु अचानक अवकाळी  पावसाने हजेरी लावल्यामुळे  वावरात काढून ठेवलेली भात पिके, मळणीसाठी जमवून ठेवलेली भात पिके,  तर काही ठिकाणी भाताच्या पेंढ्या भिजल्या असल्यामुळे याचा शेतकर्‍यांना मोठा  फटका बसला आहे.
तालुक्याच्या दक्षिण भागातील वरवडी खुर्द  वरवडी डायमंड, वरवडी बुद्रुक, अंबाडे, बालवडी, पाले, पळसोशी बाजा रवाडी, धावडी, खानापूर हातनोशी, गोकवडी, नेरे, भोर या भागात सकाळी अवकाळी पावसाने सुरुवात केली  असताना याचा भात पिकाला फटका बसला आहे. तर रब्बी हंगामातील पेरणीला फायद्याचा ठरला आहे.  खरीप हंगामातील शेतकर्‍याच्या भात उत्पादनात  घट होणार असल्यामुळे  आर्थिक  तोटा सहन करावा लागणार आहे. दिवसभर  ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकर्‍यांची मोठी धाकधूक वाढल्यामुळे  भात पिकाची जमवाजमवी करण्यामध्ये  मग्न झाले होत.
हेही वाचा :

Back to top button