बर्लिन : समुद्रातील एक वैशिष्ट्यपूर्ण जलचर म्हणजे (Octopus) ऑक्टोपस. आठ भुजांच्या या जीवामध्ये तीन हृदये आणि नऊ मेंदू असतात. अशा या अनोख्या जीवाचे आणि माणसाचे पूर्वज एकच होते असे म्हटले, तर अनेकांना आश्चर्य वाटू शकेल; मात्र एका नव्या संशोधनातून ही बाब समोर आली आहे. तब्बल 518 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर वावरणार्या एका पूर्वजापासून या दोन्ही प्रजाती कालौघात विकसित होत गेल्या आहेत.
या दोन्ही प्रजातींच्या पूर्वजाला वैज्ञानिकांनी 'फेसिवर्मिस युन्नानिकस' असे नाव दिलेले आहे. (Octopus) संशोधकांनी म्हटले आहे की, जसे जसे या जीवाचा विकास होत गेला तसा त्याने त्याच्यासाठी अनावश्यक असलेले अवयव गमावण्यास सुरुवात केली. या जीवाची बुद्धीही बरीच कमी होती. जर्मनीची राजधानी बर्लिनमधील मॅक्स डेलब्रुक सेंटरमधील संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे.
ऑक्टोपसच्या (Octopus) मेंदूची रचना मानवी मेंदूशी साधर्म्य राखणारी असते. सागरी जलचरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जनुक नियंत्रक असतात ज्यांना त्यांच्या चेतापेशीतील 'मायक्रो आरएनए' असे म्हटले जाते. मेंदूतील पेशींच्या संख्येइतकीच त्यांची संख्या असते. 'मायक्रो आरएनए' हे एक प्रकारचे 'आरएनए जनुक' आहे जे मेंदूच्या विकासात एक मौलिक भूमिका बजावते. मेंदू हा मानवी शरीराचा सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. मेंदूची संरचना ही ऑक्टोपसशी संबंध जोडणारी बाब आहे.
संशोधक निकोलस राजवेस्की यांनी सांगितले की, ऑक्टोपस (Octopus) एक अतिशय चतुर व बुद्धिमान जीव आहे. ते विविध उपकरणांचा, अवजारांचा यथायोग्य वापर करू शकतात. ते आपल्या माद्यांच्या सुरक्षेसाठी दगडांचे सुरक्षा कवच निर्माण करू शकतात आणि बचावासाठी जेलीफिशच्या जाळीचाही वापर करू शकतात. ते नारळाच्या सालीपासून स्वतःला आच्छादीत करू शकतात आणि अगदी कोडीही सोडवू शकतात. ऑक्टोपस ज्या कुळातील आहेत त्याला 'सेफलोपोडस्' असे म्हटले जाते. याच कुळात स्क्वीड आणि कटलफिशचाही समावेश होतो.
हेही वाचा :