Latest

Ishan Kishan ला स्वत:विषयी खंत, ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ होऊनही म्हणाला…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'मी जी काही कामगिरी केली त्यावर मी फारसा खूश नाही. सेट झाल्यानंतर मला मोठी धावसंख्या करायची होती. मी क्रीजवर राहून मोठी धावसंख्या करायला हवी होती. वरिष्ठांनी मला तसा सल्लाही दिला होता. पण मी त्यात अपयशी ठरलो,' अशी खंत भारताचा सलामीवीर इशान किशनने (Ishan kishan) व्यक्त केली आहे. विंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत (WI vs IND ODI Series) प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्काराने गौरव होऊनही त्याने स्वत:च्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. सामना संपल्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशनदरम्यान त्याने ही भावना बोलून दाखवली.

इशानने 3 डावात तडकावल्या 184 धावा

इशानने (Ishan kishan) विंडिविरुद्धच्या वनडे मालिकेत (WI vs IND ODI Series) सलग तीन अर्धशतके फटकावून लक्षवेधी कामगिरी केली. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने 3 डावात एकूण 184 धावा तडकावल्या. त्याची या दरम्यान त्याची सरासरी 61.33 तर, स्ट्राइक रेट 111.52 राहिला. त्याच्या बॅटमधून या तीन सामन्यांत 21 चौकार आणि 5 षटकार आले. त्याने आतापर्यंत 17 एकदिवसीय सामन्यांमध्ये 46.27 च्या सरासरीने एकूण 694 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 107.43 राहिला आहे. दरम्यान, या मालिकेत दोन्ही संघांकडून इतर कोणत्याही फलंदाजाला दोन अर्धशतकेही करता आली नाहीत. इशानने केलेल्या उत्कृष्ट खेळीचे बक्षीस त्याला मालिका संपल्यानंतर मिळाले. त्याची प्लेअर ऑफ द सिरीज (Ishan Kishan Player Of the Series) म्हणून निवड झाली.

'पुन्हा शुन्यापासून सुरुवात करणार'

इशान (Ishan kishan) पुढे म्हणाला की, मी क्रीजवर राहून मोठी धावसंख्या उभारायला हवी होती. पुढच्या वेळी मी असाच प्रयत्न करेन, मी सेट होऊन मोठी धावसंख्या करेन. ज्यावेळी तुम्ही चांगली फलंदाजी करत असता त्यावेळी दिर्घ खेळीच्या दृष्टीने सेट होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मी ठरवले आहे की, या आधीची कामगिरी विसरून शुन्यापासून सुरुवात करणार आहे.'

शुबमन गिलचे कौतुक

शुबमन गिलसोबतच्या (shubman gill) फलंदाजी बाबतही इशानने भावना व्यक्त केली. तो म्हणाला, 'गिल हा एक जबरदस्त खेळाडू आहे. तो चेंडू कसा मिडल करतो हे मी पाहिले आहे. त्याचे चेंडू फटकावण्याचे कौशल्य पाहून मला खूप आत्मविश्वास मिळतो.'

2023 च्या विश्वचषकासाठी दावेदार

भारताने तिस-या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 200 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने (Team India) मालिका 2-1 अशी खिशात घातली. वेस्ट इंडिजविरुद्ध भारताचा हा सलग 13वा मालिका विजय आहे. भारतासाठी इशान किशनने (Ishan Kishan) तिन्ही सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याची 'प्लेअर ऑफ द सिरीज' म्हणून निवड झाली. अगामी विश्वचषक संघातील दावेदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. आता त्याला संधी मिळते की नाही हे पाहावे लागेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT