पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर इराकमध्ये ख्रिश्चन विवाह सुरू असलेल्या लग्नमंडपाला लागलेल्या आगीत सुमारे १०० जणांचा मृत्यू झाला, तर १५० जण जखमी झाले आहेत. ही आग इराकच्या निनेवेह प्रांतातील हमदानिया भागात लागली. लग्नमंडपाजवळ फटाके फोडण्यात आले होते. या फटाक्यांमुळे लग्न मंडपाला आग लागल्याचं समजतं आहे.
संबंधित बातम्या :
राजधानी बगदादच्या वायव्येस सुमारे ३३५ किलोमीटर अंतरावर मोसुल शहराच्या बाहेर हे ख्रिश्चन क्षेत्र आहे, येथे ही घटना घडली. आग लागल्याने लग्नमंडपावर ज्वाळा उसळताना दिसत होत्या. यामध्ये जखमी लोकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फटाक्यांमुळे आग लागली असावी.
दरम्यान, पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच आरोग्य विभागाला तात्काळ मदत देण्याच्या सुचना दिल्या आहेत.
हेही वाचा :