पुढारी ऑनलाईन डेस्क : इतिहासाशी कुणीही खेळू नको. त्यातून राज्यात वाद पेटत राहतील, असा खोचक इशारा गृहनिर्माण कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे. काल औरंगाबाद येथील मनसेच्या सभेत राज ठाकरेंनी केलेल्या टिकेला आव्हाड यांनी पत्रकार परिषेत प्रत्त्युत्तर दिले.
पत्रकारांशी बोलताना, मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, इतिहासाचा वाद हा पेटत जाऊन तो राज्यासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे कोणीही राज्याचा खरा इतिहास बदलण्याचा प्रयत्न करू नका. याऐवजी राजकीय नेत्यांनी देश आणि राज्यातील प्रश्नांकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विरोधकांना दिला.