वय आणि बॉडी शेमिंगवरून ट्रोल झाल्या 'या' अभिनेत्री  
Latest

No More Shaming : वय आणि बॉडी शेमिंगवरून ट्रोल झाल्या ‘या’ अभिनेत्री

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन

No More Shaming- अनेकदा ट्रोलर्स सेलेब्सच्या पोस्टवर आक्षेपार्ह कमेंट्स लिहितात. तर अनेकदा चुकीचे प्रश्न विचारण्याची हिंमत करतात. काही सेलिब्रिटी त्यांना इग्नोर करतात. पण, काही सेलिब्रिटी त्यांना सडेतोड उत्तर देतात. फिल्म पुष्पाः द राइज मध्ये दक्ष्यानीची भूमिका साकारणारी अनासुया भारद्वाज हिला वयावरून शेमिंगचा सामना करावा लागला होता. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक 'आस्क मी एनिथिंग' सत्र ठेवलं होतं. यामध्ये एका युजरने एज शेमिंग करत विचारल, "मी तुम्हाला काय म्हणून बोलवू ? काकी की अक्का". (No More Shaming)

यावर अभिनेत्री अनासुया भारद्वाजने उत्तर देत सांगितलं की -काही नाही. तुम्ही मला इतक्या चांगल्या पध्दतीने ओळखत नाही. या नावाने संबोधित करणाऱ्यांच्या केवळ संस्कारावर संशय असेल. कारण, याला एज शेमिंग म्हटलं जातं." (No More Shaming)

अनासुया भारद्वाजच्या आधी अनेक सेलेब्स एज शेमिंग आणि बॉडी शेमिंगचे शिकार झाले आहेत. त्यांनी ट्रोलर्सना मजेशीर उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली होती. पाहुया-ते सेलेब्स कोण आहेत?

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन

जेव्हा ऐश्वर्या राय बच्चन प्रेग्नेंट होती, तेव्हा तिला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. यावर तिचा पती अभिषेक बच्चनने ट्रोलर्सना उत्तर देत म्हटले होते की, "हो, ती एक पब्लिक फिगर आहे, पण लोक विसरतात की ती एक महिलादेखील आहे. आता ती एक आई आहे. तुम्हा सर्वांना आपल्या मर्यादेत राहायला हवं. मी कधीही कुठल्याही महिलेसाठी अशा पध्दतीने बोलत नाही. जाहीरपणे कुण्या दुसऱ्यांनी तिच्याविषयी अशा प्रकारे बोलणं शोभत नाही."

नेहा धूपिया

नेहा धूपिया

अभिनेत्री नेहा धूपिया आपल्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रियांवरून कधीचं त्रास करून घेत नाही. ती म्हणते की, "मी बॉडी शेमिंग आणि एज शेमिंगला एक मोठ्या समस्याच्या रूपात पाहते. मी याविरोधात आहे. न केवळ सेलेब्ससाठी तर प्रत्येकासाठी फॅट-शेमिंग बंद करायलं हवं.

विद्या बालन

विद्या बालन

अभिनेत्री विद्या बालन आपल्या जीवनात बॉडी शेमिंगचं शिकार व्हावं लागलं होतं. यावर तिने एकदा प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, "मला आयुष्यभर हार्मोनल समस्या राहिल्या आहेत. हे कदाचित माझ्या शरीरासाठी मी घेतलेल्या निर्णयांमुळे असावं. जेव्हा मी लहान होते, तर लोक मला म्हणायचे की, 'तुझा चेहरा इतकं सुंदर आहे, तू तुझं वजन कमी का करत नाहीस?.

करीना कपूर

करीना कपूर खान

अभिनेता अरबाज खानच्या चॅट शोमध्ये अभिनेत्री करीना कपूरने सोशल मीडियावरील पोस्टमधील कमेंट वाचले होते. अभिनेत्रीच्या एका पोस्टवर एका युजरने लिहिलं होतं-"वयोमानानुसार कपडे घालत जा."

दुसऱ्या युजरने तिला आंटीदेखील म्हटलं होतं. यावर करीना म्हणते की, काही लोक सेलेब्ससोबत चांगला व्यवहार करत नाहीत. एक प्रसिध्द चेहरा असल्याने आमची फीलिंग्सची कुणी परवा करत नाहीं आणि हे सहन करावं लागतंय.

विद्या बालन
नेहा धुपिया

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT