गोव्यातही थंडी, अकरा वर्षांतील सर्वांत कमी तापमान | पुढारी

गोव्यातही थंडी, अकरा वर्षांतील सर्वांत कमी तापमान

पणजी : पुढारी वृत्तसेवा

पणजीत 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी किमान तापमान 17.6 अंश डिग्री सेल्सिअस व कमाल तापमान 29.2 अंश डिग्री सेल्सिअस होते. 2011 नंतरच्या प्रजासत्ताक दिनाचे हे सर्वात कमी तापमान आहे. याआधी 2019 साली सर्वात कमी तापमान 17.7 अंश डिग्री सेल्सिअस होते. 2011 साली 18.5 अंश डिग्री सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. 2008 साली सर्वात कमी 15.8 अंश डिग्री सेल्सिअस एवढे तापमान होते.

मुरगावमध्ये किमान तापमान 18.5 अंश डिग्री सेल्सिअस व कमाल तापमान 29. 6 अंश डिग्री सेल्सिअस होते. गेल्या 2-3 दिवसांत कमी होणार्‍या तापमानामुळे नागरिकांना थंडीचा सामना करावा लागतो आहे. आजपासून (गुरुवार) तापमानामध्ये वाढ होणार असून, थंडी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुढच्या पाच दिवसांसाठी मच्छीमारांना हवामानाच्या काही सूचना नसल्याचे खात्याने सूचित केले आहे.

हिवाळ्याचे वातावरण असल्याने तापमान कमी-जास्त होत असते. हे सामान्य आहे, असेही हवामान खात्याचे संशोधक राहुल मोहन यांनी सांगितले.

Back to top button