बंगळूर; वृत्तसंस्था : बंगळूर येथे रविवारी झालेल्या न्यूझीलंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेच्या खुल्या व मास्टर्स गटाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने यूएईवर विजय मिळवत विजेतेपदला गवसणी घातली. तत्पूर्वी शेवटच्या साखळी सामन्यांमध्ये यूएईने भारताला पराभवाचा धक्का देत न्यूझीलंड विरुद्ध अंतिम फेरीत स्थान मिळवले. खुल्या गटात भारतीय संघ सुरुवातीपासून दुसर्या क्रमांकावर होता, पण अंतिम टप्प्यात यूएईने दिलेल्या धक्क्याने भारताला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध झालेला पराभवसुद्धा याला करणीभूत ठरला. (New Zealand Cricket)
खुल्या गटाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडने यूएईवर 21 धावांनी विजय साजरा केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या व्हिक्टर डेविस (17 धावा व 3 बळी), ब्राडेन गार्डनर (16 धावा), डॅर्रिन कुक व मॅट लँथम (प्रत्येकी 13 धावा व 1 बळी) यांच्या कामगिरीच्या जोरावर धमाकेदार विजय मिळवला व न्यूझीलंड-एशिया कपवर नाव कोरले. (New Zealand Cricket)
हेही वाचा;