Latest

कोरोनाचा नवा व्हेरियंट: केंद्रीय गृहमंत्रालयाची आपत्कालिन बैठक

backup backup

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन:  कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन व्हेरियंट सध्या आफ्रिकेत आढळला असून अन्य ११ देशांमध्येही त्याचा फैलाव झाला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने आपत्कालिन बैठक बोलविली. या बैठकीत विमान उड्डाण्णांसह कठोर निर्बंधांबाबत चर्चा झाली.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा फैलाव झाल्यास तिसरी लाट वेगाने येण्याचा धोका आहे. त्यामुळे यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या ठराविक देशांमध्ये सुरू असलेली विमानसेवा या व्हेरियंटचा फैलाव करू शकते. त्यामुळे त्यावर निर्बंध येण्याची शक्यता आहे.

संपूर्ण जगाचा चिंतेचा विषय बदलेला कोरोनाचा नवा व्हायरस सध्या वेगाने फैलावत आहे. त्यामुळे या व्हेरियंटचा देशात फैलाव होऊ नये यासाठी यंत्रणा सतर्क झाली आहे. आज केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालिन बैठक बोलविण्यात आली. या बैठकीत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विमान उड्डण्णांच्या तारखांबाबत विचार केला जाईल.

गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. तसेच परदेश प्रवास करून आलेल्यांवर नजर ठेवली जाणार आहे. ज्या लोकांना जास्त धोका आहे अशा लोकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाचा नवा व्हेरियंट : सर्व राज्यांना सूचना

ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत. केंद्र सराकरने जारी केलेल्या सूचना आणि निमांचे सक्तीने पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. कंटेन्मेंट झोन आणि सक्रीय रुग्णांच्या ठिकाणी कडक पाहणी गरजेची आहे. रुग्णांची तपासणी वेगाने करून हॉटस्पॉटवर नजर ठेवायला हवी. लसीकरणाचा वेग वाढवून आरोग्य सुविधा वाढविण्याबाबत सूचना केल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी निर्बंधाबाबत सूचना केल्या असून आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवणे, त्यांच्या तपासणीबात आणि नमुने घेण्याची योग्य पद्धत, आदींबाबत सूचना केल्या आहे.

भारताला धोका

भारताने कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर निर्बंध आणले होते.मात्र, भारतीय नागरिकांना आणि परदेशी नागरिकांच्या प्रवासासाठी काही एअर बबल अंतर्गत करार केले होते. यानुसार जगभरातील महत्त्वाच्या देशांत भारत पूर्ण क्षमतेने वाहतूक करू शकते. सध्या भारतात ३१ देशांत एअर बबल करारानुसार हवाई वाहतूक सुरू आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT