राष्ट्रीय

इंडिया गेटवर बसवणार नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा : पंतप्रधान मोदी

Shambhuraj Pachindre

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे इंडिया गेटवरील अमर जवान ज्‍योत राष्‍ट्रीय युद्ध स्‍मारकात नेण्यावरून वाद निर्माण झालेला असतानाच केंद्र सरकारने इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रॅनाईटचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची माहिती शुक्रवारी सोशल मीडियावरून दिली.

संपूर्ण देश यंदा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करीत आहे. इंडिया गेटवर नेताजींचा पुतळा बसविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही नेताजींच्या प्रती देशवासियांची कृतज्ञता ठरेल, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नेताजींच्या 125 व्या जयंतीदिनी 23 जानेवारीला स्वतः मोदी यांच्या हस्ते नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण होईल. जोवर खरी मूर्ती लावली जाणार नाही, तोवर या जागी नेताजींची होलोग्राम मूर्ती ठेवली जाणार आहे. 60 व्या दशकापर्यंत इंडिया गेटवर जॉर्ज पंचमची मूर्ती होती. नंतर ती हटवून कोरोनेशन पार्कमध्ये पाठविण्यात आली होती.

SCROLL FOR NEXT