गांधीनगर; पुढारी ऑनलाईन : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
ते म्हणाले की, मी भाजपचे आभार मानतो. विजय रुपाणी यांनी काही वेळापूर्वी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सादर केला. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री नितीन पटेलही राज्यपालांकडे गेले.
पुढील वर्षी डिसेंबर 2022 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्याआधी विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणे अत्यंत महत्वाचे मानले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता नव्या नेतृत्वासह भाजप गुजरातमध्ये पुढील निवडणूक लढवणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आम आदमी पक्षही राज्यात भाजपला कडवी स्पर्धा देत आहे.
पक्षाने रूपाणी सरकारला जोरदार घेरले आहे, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेसह अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत, तर काँग्रेसनेही गेल्या गुजरात निवडणुकीत चांगली कामगिरी केली होती.
तेव्हापासून काँग्रेसचे कार्यकर्तेही गुजरातमध्ये सक्रियपणे मुद्दे मांडत आहेत.
विजय रुपाणी यांच्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण होणार याबाबत कोणतीही माहिती नाही.
काही वर्षे वगळता गुजरातमध्ये 1995 पासून भाजप सरकार आहे. सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही दीर्घकाळ गुजरातचे मुख्यमंत्री आहेत.
हे ही वाचलं का?