नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : घोटाळेबाज सुकेश चंद्रशेखर याला तुरुंगात मदत केल्याचा गंभीर आरोप झालेले तिहारचे पोलीस महासंचालक संदीप गोयल यांची केंद्र सरकारने बदली केली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांच्या शिफारशीनुसार ही बदली करण्यात आली आहे.
संदीप गोयल यांच्या जागी संजय बेनीवाल यांना तिहार तुरुंगाचे महासंचालक बनविण्यात आले आहे. आतापर्यंत ते मीडिया सेलमध्ये आयुक्त पदावर कार्यरत होते. सुकेश चंद्रशेखरला तुरुंगात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्याचा आरोप संदीप गोयल यांच्यावर झाला होता. तुरुंगातील अन्य 80 अधिकाऱ्यांवरही सुकेशला मदत केल्याबद्दल कारवाई होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अलीकडेच सुकेशने उपराज्यपालांना पत्र लिहित 'आप' सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर गंभीर आरोप केले होते.
हेही वाचलंत का ?