Supriya Sule pudhari photo
राष्ट्रीय

Supriya Sule Press Conference: माझी आत्या, आई अन् मावशी म्हणून घरातील मुलांकडून एकच अपेक्षा... सुप्रिया सुळेंची भावनिक साद

Anirudha Sankpal

Supriya Sule Press Conference: सुप्रिया सुळे यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वक्तव्य केलं. त्याचबरोबर त्यांनी अप्रत्यक्षरित्या पार्थ पवारांना उद्येशून एक भावनिक साद देखील घातली. सुप्रिया सुळे यांनी अल्पसंख्यांक मंत्रालयातील अल्पसंख्यांक दर्जा घोटाळा प्रकरणी देखील भाष्य केलं.

दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रीय अध्यपदाच्या निवडीबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'राष्ट्रवादीच्या त्या गटानं काय करायंच आणि काय नाही हा त्या गटाचा प्रश्न आहे. ज्या बातम्या येत आहेत त्या गटाच्या आहेत. त्याची मला फारशी कल्पना नाही.'

सुळेंना पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'पार्थ पवार यांचे प्रकरण न्यायालयात आहे. न्यायालयाचं यावर काय म्हणणं आहे त्यावर आपण कसं बोलणार. या देशात कोर्टाचा निर्णय आपल्या सर्वांना मान्य करावा लागतो. तपास अहवाल आणि कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत त्यावर बोलणं योग्य होणार नाही असं मला वाटतं.' असं वक्तव्य करत थेट बोलणं टाळलं.

सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबीयातील मुलांबाबत देखील वक्तव्य केलं. त्या म्हणाल्या की, आमच्या घरातील संस्कार जे झाले आहेत. माझा विश्वास आणि अपेक्षा आहे की आमच्या घरातील मुलं मुलींकडून असं कोणतंही काम करणार नाहीत आणि करू देखील नये. एवढी एक आत्या, आई आणि मावशी म्हणून आमच्या घरातील सगळ्याच मुलांकडून ही अपेक्षा आहे.

दरम्यान, खारगे समितीने पार्थ पवार यांना मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी अभय दिलं असून. ते जरी कंपनीचे मालक असले तरी त्यांचा यात प्रत्यक्ष सहभाग नाही असं समितीनं नमूद केलं. पार्थ पवारनं काहीही केलेलं नाही असं पार्थनं मला सांगितलं आहे.

अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्यानंतर लगेचच काही शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आला. याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं त्यावेळी, त्यांनी याची माहिती मला माध्यमातूनच मिळाली. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्टे दिला आहे असं मला कळालं आहे. हे प्रकरण माध्यमांनी उजेडात आणलं. त्यामुळं तुमचं अभिनंदन आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे याबाबत एक स्टेटमेंट द्यावं अन् हे झालंच कसं हे सांगावं अशी मागणी करते.'

त्या पुढे म्हणाल्या की, 'सुप्रिया सुळे यांनी दुखवटा काळात झालेला अल्पसंख्यांक दर्जा घोटाळ्यामुळं महाराष्ट्राची बदनामी होत आहे. महाराष्ट्राच्या पोलीस आणि प्रशासनाची एक चांगली ओळख देशात होती. आता त्याची अशा प्रकरणांमुळं बदनामी होत आहे. हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. मला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे की असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. माणुसकी राहिली आहे की नाही. त्या मंत्रालयात दुखवटा असताना असं झालंच कसं हे खूप गंभीर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT