Supreme Court Warns Wives pudhari
राष्ट्रीय

Supreme Court Warns Wives: घटस्फोट प्रकरणात नवऱ्याच्या 'बॉस'ला का पत्र लिहिताय... पुढं तुमचाच तोटा होणार, SC ने दिला इशारा

Anirudha Sankpal

Supreme Court Warns Wives: सर्वोच्च न्यायालयाने घटस्फोट प्रकरणात पतीच्या बॉसला किंवा पती ज्या कंपनीत काम करतोय त्याच्या मालकाला पत्नी थेट पत्र का लिहितात असा सवाल केला आहे. याबाबत त्यांनी काळजी व्यक्त केली असून या प्रकारच्या पत्रव्यवहारामुळं त्यांना नोकरी गमवावी लागू शकते आणि त्याचा थेट परिणाम हा पोटगीवर होऊ शकतो असं देखील सर्वोच्च न्यायालायनं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या जस्टिस बी.व्ही. नागराथना आणि जस्टिस आर. महादेवन यांनी एका प्रकरणाच्या सुनावणीवेळी हे निरीक्षण नोंदवलं आहे. गेल्या आठव्यात एका महिलेच्या पतीच्या मैत्राने दाखल केलेली मानहानीची याचिका आसामवरून गाझियाबादला ट्रान्सफर करावी यासाठी याचिका दाखल केली होती.

या महिलेने गाझियाबादमध्ये तिच्या पतीविरूद्ध अनेक केस सुरू आहेत. त्यामुळं ही केस देखील गाझियाबादमध्ये ट्रान्सफर करण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका केली होती.

या याचिकेच्या सुनावणीदरम्यान नागराथना यांना अनेक पत्नी या त्यांच्या पतीच्या बॉसला पत्र लिहिण्याचा मार्ग अवलंबतात. त्यामुळं त्यांच्या पतीची नोकरी जाते असे निरीक्षण नोंदवले. त्यांनी तुम्हाला घटस्फोट घ्यायचा आहे ही एक गोष्ट आहे. मात्र तुमच्या पतीची रोजी रोजी बंद करण्यास कारणीभूत ठरणं हे अत्यंत चुकीचं आहे असे मत व्यक्त केलं.

सुनावणीदरम्यान, पत्नीच्या वतीने युक्तीवाद करणाऱ्या वकिलांनी त्यांची पतीविरूद्ध अनेक केस गाझियाबादमध्ये सुरू आहेत. त्यात आता पतीचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

या मानहानीच्या खटल्यात पत्नीने दिल्लीतील एअर फोर्स अथोरिटीला पत्र लिहून तिचा एअर फोर्स ऑफिसर पती एक वेगळा स्वतंत्र व्यवसाय चालवतो आणि त्याने एअर फोर्स सेवेच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला होता.

जस्टीस बी. व्ही. नागराथना यांनी, 'जोडीदाराच्या बॉसला किंवा कामाच्या ठिकाणी वैवाहिक वादानंतर पत्र लिहिणे ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. पत्नी असं करतात अन् त्यामुळं पतीची नोकरी जाते. त्यामुळं त्यांचा भविष्यात पोटगीचा दावा कमकूवत होतो.'

यानंतर पत्नीकडून युक्तीवाद करणाऱ्या वकिलांनी सांगितलं की ज्यावेळी पतीकडून पत्नी आणि तिच्या भावाने एअर फोर्सच्या वस्तू चोरल्याचा आरोप केल्यानंतर हे पत्र लिहिण्यात आल्याचं सांगितलं. पतीने पत्नी आणि तिच्या भावावर एअर फोर्सचे हेलमेट चोरल्या आरोप केला होता.

दरम्यान, पत्नीकडून मानहानीचा खटला हा पतीने स्वतः केला नसून त्याच्या मित्राने केला आहे असं देखील सांगितलं. कोर्टाने हे प्रकरण मेडिएशन सेंटरकडे पाठवलं आहे. तिथं दोन्ही पक्षांमध्ये काही सेटलमेंट होते का याची शक्यता पडताळून पाहिली जाणार आहे. त्यानंतर जस्टिस नागराथना यांनी पत्नीकडून लढणाऱ्या वकिलांना सर्व मतभेद सोडवून केलेले आरोप मागे घेण्याचा सल्ला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT