Sonam Wangchuk Message pudhari
राष्ट्रीय

Sonam Wangchuk Message: केंद्रीय मंत्र्यांच्याच हस्ते उपोषण का सोडलं; काय डील झालं... सोनम वांगचुक यांनी नेमकं काय सांगितलं?

Anirudha Sankpal

Sonam Wangchuk Message: पर्यावरण शास्त्रज्ञ आणि कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर एक २२ मिनिटाचा दीर्घ व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी यात आपलं समर्थक आणि टीकाकार दोघांनाही संबोधित केलं. त्यांनी मध्यरात्री २६ दिवसाचा आपले उपोषण सोडले. त्यानंतर त्यांच्यावर काही राजकीय ग्रुप्स टीका करत आहे.

या व्हिडिओत त्यांनी सोनम वांगचुक यांनी त्यांचे उपोषण मागे का घेतले असे म्हणणाऱ्यांना प्रतिप्रश्न केला आहे. त्यांनी २६ दिवसांच्या उपोषणानंतर मला माझा प्रामाणिकपणा सिद्ध करायची गरज आहे का? सोनम वांगचुक यांनी रूग्णालयाच्या बेडवरून हा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यांनी आपल्या या दीर्घ उपोषणाचा काय परिणाम होणार आहे हे सांगितलं तसेच आपल्यावर होणाऱ्या टीकेवर देखील उत्तर दिलं.

वांगचुक म्हणाले की, 'मित्रांनो मी हा व्हिडिओ दुखःद मनाने करत आहे. माझ्या सध्या आश्चर्य, खेद अन् राग अशा समिश्र भावना निर्माण झाल्या आहेत. शारीरिकदृष्ट्या मी अजूनही लढतोय, संघर्ष करतो. मी उपोषणात अजून एक उपोषण सहन करतोय. माझ्यात उरलेल्या शक्तीनिशी मी जमिनीवर पडून होतो. माझ्या उपोषणाच्या २० व्या आणि २२ व्या दिवशी अवस्था खराब होती. मला बळजबरीने हटवण्यात आलं.'

वांगचुक म्हणाले, 'माझे शरीर मलाच खात होते. माझे स्नायू क्षीण झाले होते. त्यांचे न भरून येणारे नुकसान झाले होते. माझा मेंदू आणि अवयव हे काय चालू हे हे समजण्यापलीकडे गेले होते.'

दरम्यान जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या हातून सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घेतलं. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. याबाबत बोलताना सोनम वांगचुक म्हणाले की, 'सकाळपासून अनेक लोकं मला कॉल करून किंवा पोस्ट दाखवून तुम्ही त्यांच्या हातूनच उपोषण का मागं घेतलं असे प्रश्न विचारत आहेत. तुम्ही दुसऱ्या कोणाच्या हातून उपोषण का मागं घेतलं नाही? काय डील झालं आहे. काय वाटाघाटी झाल्या असं विचारण्यात येत आहे.

आता मला माझे उपोषण किती शुद्ध होतं हे सांगण्यासाठी कोणाच्या सर्टिफिकेटची गरज लागणार आहे का? त्यांनी पाठीमागच्या दाराने काही वाटाघाटी झाल्याची शंका फेटाळून लावली. ते म्हणाले की, 'जर अशा वाटाघाटी करायच्या असतील, डील करायची असती तर कोण २६ दिवस उपाशी राहील का? तुम्ही बाकीच्यांनी किती डील केल्या आहेत ते पाहिलं पाहिजे. त्यांनी अशा प्रकारे डील केलं आहे का. मी एखाद्या आलीशान एअर कंडिशन रूममध्ये बसून उपोषण करू शकलो नसतो का किंवा डील बार्गेन करू शकलो नसतो का. मी दिल्लीच्या उष्णतेत रस्त्याच्या कडेला बसून उपोषण का केलं.

दरम्यान, कॉक्रेज जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी जरी सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागं घेतलं असलं तरी दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेलं पक्षाचं आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा होत नाही तोपर्यंत ते सुरूच राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. सरकारने आता कॉक्रोज जनता पार्टीसोबत चर्चा करण्यास सुरूवात केली आहे. कॉक्रोज जनता पार्टीने सरकारला आज दुपार्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT