Sonam Wangchuk Fast End: सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडले

PM Narendra Modi on Paperleak: मोदींचा व्हिडिओ जारी होताच वांगचुक यांनी देखील उपोषण सोडल्याचे जाहीर केले.
Sonam-Wangchuk
Sonam-WangchukPudhari
Published on
Updated on

Sonam Wangchuk Fast End

प्रशांत वाघाये

नवी दिल्ली : कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी असलेले सोनम वांगचुक यांनी अखेर २६ व्या दिवशी त्यांचे उपोषण सोडले आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सूप पाजून त्यांचे उपोषण सोडवले. याप्रसंगी सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो देखील उपस्थित होत्या.

गुरुवारी मध्यरात्री पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ मेसेज शेअर केला आणि नीट पेपरफुटी प्रकरणी अधिक कठोर कारवाई होईल, असा संदेश दिला. त्यानंतर काहीच मिनिटात सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्याचे वृत्त आले.

काय म्हणाले वांगचुक?

उपोषण सोडल्यानंतर सोनम वांगचुक X पोस्ट करत म्हणाले की, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह तसेच लडाखच्या अपेक्स बॉडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत मी अखेर २६ दिवसांचे उपोषण सोडले. यापूर्वी विविध राजकीय पक्षांतील ६५ खासदारांनी माझी भेट घेतली होती किंवा उपोषण सोडण्याचे आवाहन करणाऱ्या पत्रांवर स्वाक्षरी केली होती. विविध अटींवर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आणि देशात संभाव्य हिंसाचाराची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. या चर्चेत मान्य झालेल्या अटींचा सविस्तर खुलासा मी लवकरच एका स्वतंत्र व्हिडिओद्वारे करणार आहे.

दरम्यान, कुठेही कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ नये, यासाठी आपण सर्वांनी अत्यंत सतर्क राहावे, असे आवाहन मी करतो, असेही वांगचुक यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

नेमके कोणते आश्वासन?

सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडले असले तरी त्यांना नेमके कोणते आश्वासन सरकारने दिले आणि त्यापूर्वी वांगचुक यांनी कोणत्या अटी ठेवल्या होत्या, याबाबत अधिक माहिती अद्याप जारी करण्यात आली नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या मुद्द्यावर आश्वासन सोडले याची चर्चा समाज माध्यमांवर तातडीने सुरू झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news