airport pudhari
राष्ट्रीय

Celebi Aviation: भारताचा तुर्कीएला दणका! देशातील 9 विमानतळांवर कार्यरत तुर्कीश कंपनीचा सिक्युरिटी क्लियरन्स रद्द

Celebi Aviation: राष्ट्रीय सुरक्षिततेसाठी निर्णय; तातडीने निर्णयाची अंमलबजावणी

Akshay Nirmale

Celebi Aviation's Celebi Ground Handling India Private Limited security clearance

नवी दिल्ली: भारतातील नऊ प्रमुख विमानतळांवर सेवा देणाऱ्या तुर्कीश कंपनीची सुरक्षा मंजुरी (सिक्युरिटी क्लियरन्स) गुरूवारी 15 मे रोजी संध्याकाळी रद्द करण्यात आली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, Celebi Ground Handling India Private Limited या कंपनीची सुरक्षा मंजुरी तत्काळ प्रभावाने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने रद्द करण्यात येत आहे.

तुर्कीएने ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला दिलेल्या पाठिंब्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. ही भारताची तुर्कीए कंपन्यांविरोधातील पहिली स्पष्ट कारवाई असून, गेल्या काही वर्षांत भारताने तुर्कीएच्या पारंपरिक विरोधकांशी - ग्रीस, आर्मेनिया, सायप्रस तसेच सौदी अरेबिया व युनायटेड अरब एमिरात यांच्याशी संबंध वाढवले आहेत.

भारतातील सेलेबी एव्हिएशनची सेवा

सेलेबी एव्हिएशनने भारतात जागतिक दर्जाच्या ग्राउंड हँडलिंग सेवा देण्याच्या उद्देशाने प्रवेश केला.

भारतात येताच त्यांनी दोन स्वतंत्र संस्था स्थापन केल्या:

1) सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया – ग्राउंड हँडलिंग संचालनासाठी

2) सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया – दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरील मालवाहतूक सेवा हाताळण्यासाठी.

तुर्कीए-पाकिस्तान संबंध

तुर्कीए, पाकिस्तान आणि अझरबैजान हे तीन देश व्यापार, बँकिंग आणि पर्यटन यामार्फत एकमेकांशी निकट संबंध ठेवतात. त्यांच्या लष्करी बाबतीतही सहकार्य आहे.

या वेळी, भारताने पाकिस्तान आणि पाक-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइक (ऑपरेशन सिंदूर) नंतर तुर्कीने फक्त तोंडी पाठिंबा दिला नाही, तर भारतावर 8 मे रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यांपैकी बहुतांश ड्रोन तुर्कीच्या बनावटीचे होते – Asisguard SONGAR आणि Bayraktar TB2 या मानवरहित लढाऊ ड्रोनचा समावेश होता.

ऑपरेशन सुरू होण्याच्या आधीच एक तुर्की युद्धनौका कराची बंदरात दाखल झाली होती आणि काही वेळात तुर्की हवाई दलाचे C-130 विमान तिथे उतरले होते.

तुर्कीवर बहिष्काराची लाट

तुर्कीच्या पाकिस्तानला दिलेल्या समर्थनामुळे भारतात मोठा जनआक्रोश उसळला आहे. तुर्कीमधील पर्यटन आणि व्यापारावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन सोशल मीडियावर झपाट्याने पसरले आहे.

भारतीय पर्यटक तुर्कीतील प्रवास रद्द करत आहेत आणि बुकिंग वेबसाईट्स तुर्कीचे टूर पॅकेजेस रद्द करत आहेत. तुर्कीला पर्यटनातून मिळणाऱ्या महसुलात यामुळे मोठी घट होण्याची शक्यता आहे (तुर्कीचा 12 % महसूल पर्यटनावर आधारित आहे).

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठासह अनेक विद्यापीठांनी तुर्कीशी असलेले शैक्षणिक करार रद्द केले आहेत.

सर्व व्यापार थांबविण्याचा विचार

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) या व्यापाऱ्यांच्या संघटनेने तुर्की आणि अझरबैजानसोबत सर्व व्यापार करार समाप्त थांबविण्याचा विचार सुरू केला आहे.

या संघटनेने याआधी चीनविरोधातही अशा प्रकारचा मोहीम चालवली आहे. CAIT याबाबत उद्या दिल्लीत बैठक घेणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT