

H-1B Visa Registration
वॉशिंग्टन/नवी दिल्ली: युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर सेवा (USCIS) विभागाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2026 साठी पात्र H-1B व्हिसा नोंदणीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 27 टक्क्यांची घट झाली आहे. आर्थिक वर्ष 2025 साठी पात्र नोंदणी 4,70,342 होती, जी आर्थिक वर्ष 2026 मध्ये 3,43,981 वर घसरली.
या वर्षी नवीन H-1B व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या सुद्धा कमी झाली. सुमारे 3,36,000 पात्र ‘युनिक’ अर्जदार होते, जे मागील वर्षीच्या सुमारे 4,23,000 च्या तुलनेत कमी आहे.
एका व्यक्तीसाठी अनेक नोंदण्या दाखल केल्या जाण्याच्या संख्येत मोठी घट झाली — आर्थिक वर्ष 2025 मध्ये 47314 नोंदण्या होत्या, तर या वर्षी केवळ 7828.
USCIS ने सांगितले की, त्यांनी नवीन "Beneficiary-centric" निवड प्रणाली लागू केली आहे, ज्याचा उद्देश प्रामाणिकपणा वाढवणे व बनावट नोंदणी टाळणे आहे.
नोंदणी करणाऱ्या नियोक्त्यांची संख्या मात्र स्थिर राहिली — आर्थिक वर्ष 2026 साठी सुमारे 57,600 तर गेल्या वर्षी ती 52,700 होती.
2021: 2,74,237
2022: 3,08,613
2023: 4,83,927
2024: 7,80,884
2025: 4,79,953
2026: 3,58,737
2026 आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक अर्जदारासाठी सरासरी 1.01 नोंदण्या दाखल झाल्या, जे 2025 मधील 1.06 च्या तुलनेत कमी आहे.
USCIS ने सांगितले की नवीन प्रणालीमुळे बनावट नोंदणी व गैरप्रकारांमध्ये घट झाली आहे. अर्जदारांनी खरी माहिती द्यावी व नोंदणी ही खरी नोकरीच्या ऑफरसाठीच असल्याचे प्रमाणित करावे, असा नियम आहे.
जर नोंदणीमध्ये चुकीची माहिती आढळली, तर ती अमान्य केली जाऊ शकते. चुकीच्या माहितीवर आधारलेली व्हिसा याचिका नाकारली जाऊ शकते किंवा रद्द केली जाऊ शकते आणि कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते.
पुढील वर्षी पुन्हा अर्ज करणे
L-1 (इंट्रा-कंपनी ट्रान्सफर), O-1 (असामान्य कौशल्य असलेले व्यक्ती), किंवा F-1 OPT (विद्यार्थ्यांसाठी) सारख्या इतर व्हिसा पर्यायांचा विचार करणे
जर कंपनी बहुराष्ट्रीय असेल, तर इतर देशात काम सुरू ठेवणे
FY2023 मध्ये सुरुवातीच्या H-1B व्हिसांपैकी 58 टक्के म्हणजे 68,825 व्हिसा भारतीयांना मिळाले, तर व्हिसा विस्ताराच्या एकूण 2,10,000 पैकी 79 टक्के विस्तार भारतीयांना मिळाले. चिनी अर्जदारांना 16,094 सुरुवातीचे व्हिसा व 29,250 विस्तार मिळाले. 2024 आणि 2025 आर्थिक वर्षासाठीची देशनिहाय आकडेवारी अजून जाहीर झालेली नाही.
दरवर्षी सर्वाधिक H-1B व्हिसा भारतीय IT, इंजिनीयरिंग व सॉफ्टवेअर व्यावसायिकांना दिले जातात. अनेक भारतीय विद्यार्थ्यांना F-1 व्हिसानंतर H-1B वर जाण्याची संधी मिळते
H-1B व्हिसा हा एक प्रकारचा नॉन-इमिग्रंट (अस्थायी) व्हिसा आहे जो अमेरिकेत काम करणाऱ्या बाहेरील देशांच्या कर्मचाऱ्यांकरिता दिला जातो.
तथापि, हे कामगार विशिष्ट व्यावसायिक कौशल्य, शैक्षणिक पात्रता आणि तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, संगणकशास्त्र, वित्त यांसारख्या क्षेत्रांतील अनुभव असलेले असतात.
सुरवातीला या व्हिसाचा कालावधी 3 वर्षे असतो तो जास्तीत जास्त 6 वर्षांपर्यंत वाढवता येतो
हा व्हिसा अमेरिकन कंपनीकडून प्रायोजित (Sponsor) असणे आवश्यक
वार्षिक मर्यादा (Cap) सध्या 65000 सामान्य कोटा + 20000 (ज्यांनी अमेरिकेत मास्टर्स केले आहे)
अमेरिकन कंपनी तुम्हाला Sponsor करते
USCIS (United States Citizenship and Immigration Services) कडे H-1B याचिका दाखल केली जाते
जर अर्ज H-1B कोट्याच्या मर्यादेत असेल, तर लॉटरी (random selection) प्रणालीद्वारे निवड केली जाते
निवड झाल्यास, तुम्ही अमेरिकेत काम करण्यासाठी प्रवास करू शकता