Saurav Das pudhari
राष्ट्रीय

Saurav Das On Judiciary: जामीनावर बाहेर असलेल्या सौरभ दासचं मोठं धाडस... अनेक न्यायाधीशांनी देशाला धोका दिल्याचा केला आरोप

दासने कोणाचे नाव न घेता देशातील अनेक न्यायमूर्तींनी देशाला आणि संविधानाला धोका दिला आहे असा दावा केला.

Anirudha Sankpal

Saurav Das On Judiciary: जवळपास एक आठवडा तिहार जेलमध्ये घालवल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचा सह संयोजक सौरभ दास नरमाईची भूमिका घेतली होती. मात्र आता सौरभ दासने थेट न्याय व्यवस्थेतील काही न्यायमूर्तींवर टीका करत खळबळ उडवून दिली आहे.

नाव न घेता टीका

सौरभ दासने यापूर्वी देखील न्याय प्रक्रियेवर कडक शब्दात टीका केली होती. आता त्याने कोणाचे नाव न घेता देशातील अनेक न्यायमूर्तींनी देशाला आणि संविधानाला धोका दिला आहे असा दावा केला. शित्रण मंत्र्यांच्या राजीनामा घेतल्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्तांचे देखील उत्तरदायीत्वाची मागणी केली आहे. आता तोच सौरभ दास न्यायमूर्तींबाबत देखील वक्तव्य करतोय.

सीजेपीच्या स्थापनेपूर्वी लीगल रिपोर्टिंग करणाऱ्या दासने अनेकवेळा न्यायालयावर कडक शब्दात टीका केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या जज स्वर्ण कांता शर्मा यांच्यावरील टीकेवरून त्याच्यावर अवमानाचा खटला देखील सुरू आहे. दिल्लीच्या कथित मद्य घोटाळ्याचे प्रकरण जस्टिस स्वर्ण कांता शर्मा यांच्या बेंचसमोर गेले होते त्यावेळी सौरभ दास याने त्यांच्यावर आरोप केला होता. हे आरोप नंतर आपच्या नेत्यांना शेअर केला होते. दासने एसआयआर प्रक्रियेत कथित गडबडीला सर्वोच्च न्यायालयाला देखील दोषी धरले होते.

काय म्हणाला सौरभ दास?

सौरभ दासने पुन्हा एकदा न्यायाधीशांनी देशाला धोका दिल्याचा आरोप केला आहे. अकाऊंटेबिलिटी ऑफ जजेस ऑफ द सुप्रीम कोर्टा अँड हाय कोर्ट या विषयावर मंगळवारी दिल्लीत होणाऱ्या एका कार्यक्रमात सामील होणाऱ्या लोकांना अपील करत सौरभ दासने हे वक्तव्य केलं.

तो म्हणाला, 'सध्याचा काळ पहाता हा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. कृपया यात सामील व्हा. न्यायमूर्तींचे उत्तरदायीत्व ही आता काळाची गरज आहे. दुर्दैवाने अनेक न्यायमूर्तींनी देशाला धोका दिला आहे. संविधानासोबत फ्रॉड केले आहे. त्यांचे उत्तरदायीत्व योग्य वेळी निश्चित केली जाईल.'

कार्यक्रमाला उपस्थित रहा

सौरभ दासने या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे. या कार्यक्रमात सर्वोच्च न्यायालयाचे माजी जस्टीस ए.एस ओका, कपील सिब्बल आणि प्रशांत भूषण यासारखे वक्ते सामील होणार आहेत. सौरभ दासने माजी सरनायायधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या कार्यशैलीवर टीका होऊ लागल्यावर त्याचा लेख लाचण्याचे देखील आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT