S-350 Vityaz pudhari photo
राष्ट्रीय

S-350 Vityaz: पाकिस्तानची दातखिळी बसणार! रशिया भारताला देणार अजून एक घातक एअर डिफेन्स सिस्टम; जाणून घ्या खास वैशिष्टे

नुकत्याच झालेल्या उच्च स्तरावरील चर्चेत एस-३५० व्यतिरिक्त एस-४०० रेजिमेंट्स आणि एस-५०० सिस्टमवर देखील चर्चा झाली आहे.

Anirudha Sankpal

S-350 Vityaz India More Advanced Air Defense System: रशियाने भारताला त्यांची मध्यम पल्याची एअर डिफेन्स सिस्टम एस-३५० ऑफर केली आहे. विशेष म्हणजे रशियाने ही ऑफर टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसह दिली आहे. म्हणजे भारत या एअर डिफेन्स सिस्टमचे काही भाग हे स्वतः बनवू शकतो. रोस्टेकने दिलेल्या माहितीनुसार ही सिस्टम भारताच्या सध्याच्या एस ४०० ट्रायम्फ बॅटऱ्यांना देखील सपोर्ट करू शकणार आहे. यामुळे भारताची एकात्मिक एअर डिफेन्स सिस्टम नेटवर्क अजून स्ट्राँग होणार आहे.

नुकत्याच झालेल्या उच्च स्तरावरील चर्चेत एस-३५० व्यतिरिक्त एस-४०० रेजिमेंट्स आणि एस-५०० सिस्टमवर देखील चर्चा झाली आहे. मात्र रशिया सध्या एस-३५० सिस्टम त्वरित उपलब्ध आणि व्यवाहारिक पर्यायाच्या स्वरूपात पुढं केलं आहे. भारतात आधीपासूनच एस-४०० या एअर डिफेन्स सिस्टमच्या तीन स्वाड्रन ऑपरेशनल झाल्या आहेत. अजून दोन सिस्टम येणाऱ्या काळात भारताच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. एस-३५० ही मध्यम आणि इनर लेअर डिफेन्ससाठी आदर्श मानली जात आहे.

S-350 Vityaz ची मुख्य वैशिष्टे :

S-350 Vityaz ही ( एक्सपोर्ट व्हर्जन एस - ३५० ई) रशियाचे अत्याधुनिक मध्यम रेंजचे सर्फेस टू एअर मिसाईल स्टिस्टम आहे. ही सिस्टम अल्माज - एंटे यांच्याद्वारे तयार केली आहे. ही जुन्या एस - ३०० पीएस सिस्टमला रिप्लेस करण्यासाठी डिझाईन करण्यात आली आहे.

रेंज : एरोडायनॅमिक टार्गेट्ससाठी विशेष करून फायटर जेट्ससाठी याची रेंज १२० किलोमीटरपर्यंत आहे. तर बॅलेस्टिक मिसाईलसाठी याची रेंज २५ ते ३० किलोमीटर आहे.

उंची : ही एअर डिफेन्स सिस्टम २० ते ३० किलोमीटर अंतरावरची टार्गेट्स इंटरसेप्ट करू शकतात.

मिसाईल: यात प्रामुख्याने अॅक्टिव्ह रडार गायडेड 9M96E आणि 9M96E2 मिसाईल, त्याच्या जोडीला शॉर्ट रेंजचे 9M100 च्या मिसाईलचा समावेश आहे. एका लाँचरमध्ये १२ मिसाईल लोड करता येतात.

टार्गेट क्षमता : एकावेळी ही एअर डिफेन्स सिस्टम विमान अन् हेलिकॉप्टर सारखी १६ टार्गेट्स तर १२ बॅलेस्टिक मिसाईल टार्गेट्स ट्रॅक करून त्यावर अटॅक करू शकते.

रडार : कमी उंचीवरील टार्गेट्सला देखील पकडण्याची क्षमता असलेल्या मल्टीफंक्शन AESA रडार सिस्टम आहे.

इतर फिचर्स : ही सिस्टम मोबाईल असून ती लवकर डिप्लॉय होते. क्रुझ मिसाईल, ड्रोन्स आणि प्रेसिजन गायडेड बॉम्ब तसेच स्टेल्थ टार्गेट्सला देखील रोकण्याची क्षमता आहे.

ही सिस्टम एस - ४०० ला लेयर्ड एअर डिफेन्स सिस्टम वनवते. एस ४०० लांब पल्याची टार्गेट सांभाळते अन् एस - ३५० ही मध्यम अन् कमी अंतरावरील टार्गेट्स इंटरसेप्ट करतात.

चीन - पाकिस्तानपासून सुरक्षा

भारताची पश्चिम सीमा ही पाकिस्तानशी आणि उत्तर पूर्व सीमा ही चीनशी लागून आहे. दोन्ही देशांकडे अत्याधुनिक फायटर जेट्स, क्रुझ मिसाईल आणि बॅलेस्टिक मिसाईल आणि ड्रोन आहेत.

पाकिस्तानच्या जेएफ - १७, जे - १० सारखी फायटर जेट्स आहेत. तर बाबर सारखे क्रुझ मिसाईल कमी उंचीवरून हल्ला करते . एस - ३५० या कमी उंचीवरून उडणाऱ्या धोक्यांना सहजासहजी थोपवू शकते. ऑपरेशन सिंदूरमध्ये एस - ४०० ने पाकिस्तानच्या हल्ल्याला थोपवलं होत. आता एस - ३५० लेअर अजून दाट करण्याची शक्यता आहे. याची तैनाती पंजाब आणि राजस्थान बॉर्डरवर केली जाऊ शकते.

चीनलाही शह

चीनच्या जवळ जे - २० स्टेल्थ फायटर, डीएफ - १७ हायपरसोनिक मिसाईल आहेत. तसेच मोठ्या संख्येने ड्रोन फ्लिट देखील आहे. लडाख आणि अरूणाचल प्रदेश सारख्या उंच भागात हे मध्यम पल्याच्या मिसाईलचा धोका जास्त आहे. एस - ३५० च्या मल्टी टार्गेटिंग क्षमतेमुळे आणि त्वरित रिअॅक्शन टाईममुळे भारत LAC वर एक मजबूत सुरक्षा भींत उभारू शकतो. एस - ४०० च्या साथाने हायपरसोनिक आणि बॅलेस्टिक धोके चांगल्या पद्धतीनं हँडेल करू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT