Rajya Sabha MP Son Aston Martin Case pudhari
राष्ट्रीय

Rajya Sabha MP Son Aston Martin Case: भर दुपारी खासदार पुत्राने एस्टिन मार्टीनने रस्ता क्रॉस करणाऱ्या महिलेला उडवलं; अटक नाही

Anirudha Sankpal

Rajya Sabha MP Son Hit And Run Case: आंध्र प्रदेशमधील जन सेना नेते आणि राज्यसभा खासदार लिंगमनेई रमेश यांच्या मुलाने २६ वर्षाच्या महिलेला एस्टॉन मार्टीन सुपरकार गाडीने उडवलं आहे. त्याने १६ ऑगस्ट रोजी बेदरकारपणे गाडी चावलत इनऑर्बीट मॉलमध्ये काम करणाऱ्या २६ वर्षाच्या सेल्सगर्ल भारती मुखी यांना ठोकर मारली. त्या दुपारी ३ वाजणेच्या सुमारास रस्ता क्रॉस करत असताना हा अपघात झाला.

या प्रकरणी FIR दाखल झाली असून २१ वर्षाचा लिंगमनेई संजुश यांची भरदाव कार २६ वर्षाच्या भारती मुखी यांना धडकली असा उल्लेख आहे. या अपघातानंतर भारती मुखी यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. याबाबतची तक्रार लाईफस्टाईल मॅनेजरने तक्रार दाखल केली आहे.

यात त्यांनी भारती आणि त्यांच्या सहकारी जवळच्या हॉटेलमध्ये पार्सल कलेक्ट करण्यासाठी गेल्या होत्या. तेथून परत येत मॉलमध्ये येत असताना हा अपघात झाला.

त्यांना संजुश यांनी त्वरित अपोला रूग्णालयात दाखल केलं आहे. संजुश यांनी एस्टॉन मार्टीन या गाडीतूनच जखमी महिलेला रूग्णालयात नेलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दरम्यान, पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०६(१) रॅश ड्रायव्हिंग आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या कलमाअंतर्गत दोषी आढळून आलं तर पाच वर्षापर्यंत तुरूंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतुद आहे.

माधापूर सहाय्यक सीपी श्रीधर यांनी सांगितलं की या प्रकरणी सध्या तरी अजून कोणाला अटक केलेली नाही. ही कलमे जामीनपात्र आहेत. या प्रकरणात सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत. आम्ही आरोपीला नोटीस बजावली आहे. पोलिसांकडून यात कोणतीही कुचराई करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT