

Shehzad Poonawalla Mother Hit And Run: भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी दावा केला आहे की त्यांच्या आईवर मुद्दाम गाडी घालण्याचा प्रयत्न झाला अन् त्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना पुण्यात झाली असून शेहजाद पुनावाला यांनी या प्रकरणाचा संबंधित प्रशासनाकडून योग्य तो तपास करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
पूनावाला यांनी सांगितले की, एका अज्ञात गाडीचालकाने त्यांच्या आईच्या अंगावर गाडी घातली आणि त्यानं तिथून पळ काढला. माझी आई तिथंच गंभीर अवस्थेत पडली होती. पूनावाला यांनी त्यांच्या आईवर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यांनी आई लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थाना करण्याची विनंती केली आहे.
शेहजाद पुनावाला यांनी एक्सवर ट्विट करून याची माहिती दिली. ते ट्विटमध्ये म्हणतात, 'काही तासापूर्वी एक अत्यंत निर्लज्ज वक्तीने माझ्या आईवर मुद्दाम गाडी चढवली. त्यानंतर तिला गंभीर अवस्थेत तिथंच टाकून तो पळून गेला. तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. कृपा करून तिच्यासाठी प्रार्थना करा.'
भाजप प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी त्यांची आई ही एक प्रेमळ व्यक्ती आहे. त्यांच्याबाबतीत झालेल्या या घटनेचा माझ्यावर खोलवर परिणाम झाला आहे अशी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, 'माझी आई ही प्रेमळ आणि चांगली व्यक्ती आहे. या वयात तिच्याबाबतीत अशी घटना झाल्यानं माझं रक्त उसळलं आहे.'
शेहजाद पुनावाला यांनी पुणे शहर पोलिस, पुणे पोलीस आयुक्त, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही पोस्ट टॅग केली आहे. त्यांनी लवकरात लवकर या व्यक्तीविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
ते पुढं म्हणतात की, 'मला आशा आहे की पुणे पोलीस या दोषी व्यक्तीला अटक करतील आणि त्याला यातून सुटण्याची संधी देणार नाहीत.'