Salman Khan : सलमान खानची पहिली गर्लफ्रेंड कोण होती? 
राष्ट्रीय

Salman Khan : पाकिस्‍तानचा थयथयाट: 'बलुचिस्तान'चा साधा उल्लेख... अन् अभिनेता सलमान खान थेट 'दहशतवादी' घोषित!

बलुचिस्तानच्या फुटीरतावादी नेत्यांकडून अभिनेत्याच्या विधानाचे स्वागत

पुढारी वृत्तसेवा

रियाध येथील 'जॉय फोरम २०२५' मध्ये शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत सलमान खानने मध्य पूर्वेत भारतीय सिनेमाच्या वाढत्या प्रसाराबाबत चर्चा केली होती. याच चर्चेदरम्यान सलमानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा उल्लेख स्वतंत्रपणे केला होता.

Pakistan Declares Actor Salman Khan 'Terrorist'

अभिनेता सलमान खानने बलुचिस्तानबद्दल नुकतच्‍या केलेले विधान पाकिस्‍तान सरकारला चांगलेच झोंबले आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्‍तानने अभिनेता सलमान खान याला 'दहशतवादी' म्हणून घोषित करण्यात आले असून, त्याला पाकिस्तानच्या १९९७ च्या 'दहशतवाद विरोधी कायद्याच्या' ४ थ्या शेड्युलमध्ये (4th Schedule) टाकण्यात आले आहे.

'फोर्थ शेड्युल'मध्ये समावेश

दहशतवादी संबंधांचा संशय असलेल्या व्यक्तींच्या 'ब्लॅकलिस्ट'मध्ये (काळ्या यादीत) ४ थ्या शेड्युलचा समावेश होतो. याचा अर्थ सलमान खानवर आता कडक पाळत, हालचालींवर निर्बंध आणि संभाव्य कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

काय म्‍हणाला होता सलमान खान?

रियाध येथील 'जॉय फोरम २०२५' मध्ये शाहरुख खान आणि आमिर खान यांच्यासोबत सलमान खानने मध्य पूर्वेत भारतीय सिनेमाच्या वाढत्या प्रसाराबाबत चर्चा केली होती. याच चर्चेदरम्यान सलमानने बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा उल्लेख स्वतंत्रपणे केला. यावेळी सलमान खान म्हणाला होता, "आत्ता, तुम्ही जर हिंदी चित्रपटाची निर्मिती करुन सौदी अरेबियात प्रदर्शित केलात, तर तो सुपरहिट होईल. तसेच तमिळ, तेलुगू किंवा मल्याळी चित्रपट बनवला, तरी तो शेकडो कोटींचा व्यवसाय करेल. कारण अनेक लोक इतर देशांतून येथे आले आहेत. येथे बलुचिस्तानचे लोक आहेत, अफगाणिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानचे लोक आहेत... प्रत्येकजण येथे काम करत आहे."

बलुचिस्तानमधील नेत्यांकडून कृतज्ञता व्यक्त

सलमान खानच्या या विधानामुळे पाकिस्तानी सरकार संतापले असले तरी, बलुचिस्तानमधील फुटीरतावादी नेत्यांनी त्याचे स्वागत केले आहे. बलुच स्वातंत्र्याचे खंदे समर्थक मीर यार बलुचिस्तान यांनी सलमानच्या उल्लेखाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या मते, सलमानच्या या विधानामुळे कोट्यवधी बलुचिस्तान लोकांना आनंद झाला आहे. अनेकांना बलुचिस्‍तानचा उल्‍लेख स्‍वतंत्रपणे करणे संकोच वाटतो;पण सलामान खानने आमचा उल्‍लेख स्‍वतंत्रपणे केला. बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे 'सॉफ्ट डिप्लोमसी'चे हे एक शक्तिशाली कृत्य असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पाकिस्‍तान सरकारविरोधात बलुचिस्‍तानमध्‍ये प्रचंड रोष

बुलचिस्‍तान हा पाकिस्‍तानचा मोठा प्रांत आहे. देशातील तब्‍बल ४६ टक्‍के क्षेत्रफळ असणार्‍या या प्रातांत केवळ ६ टक्‍के म्‍हणजे सुमारे १.५ कोटी लोकसंख्‍येचे वास्‍तव्‍य आहे. या प्रांताकडे पाकिस्‍तान सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. खनिज संपदेने समृद्ध असूनही या प्रांताला भेदभावाची वागणूक मिळत असल्‍याने बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात अविकसित प्रदेश आहे आणि येथील सुमारे ७०% लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असून, सरकारविरोधात प्रचंड रोष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT