Pahalgam Terror Attack pudhari photo
राष्ट्रीय

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ला NIA च्या चार्जशीटमधील 'ते' सात आरोपी कोण... यात दोन भारतीयांचा देखील आहे समावेश

चार्जशीटमध्ये पाकिस्तानमधून या हल्ल्याचे षडयंत्र कसं रचण्यात आलं हे सांगितलं आहे.

Anirudha Sankpal

  • ऑपरेशन महादेव दरम्यान तिघांचा खात्मा

  • दोन भारतीय नागरिकांचाही समावेश

  • पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ जणांचा झाला होता मृत्यू

Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तब्बल ८ महिन्यांनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA ने सात आरोपींविरूद्ध चार्जशीट दाखल केलं आहे. एनआयएच्या चार्जशीटमध्ये लष्कर-ए-तैयब्बा आणि द रेजिस्टंट फ्रंट (TRF) या दोन संघटनांचे नाव सामील आहे. चार्जशीटमध्ये पाकिस्तानमधून या हल्ल्याचे षडयंत्र कसं रचण्यात आलं हे सांगितलं आहे. हा दावा सिद्ध करण्यासाठी एनआयएने अनेक पुरावे या चार्जशीटला जोडले आहेत. एनआयएने सांगितले की लष्कर आणि टीआरएफने या दहशतवादी हल्ल्याच्यामागे आपली सर्व ताकद उभी केली होती.

ऑपरेशन महादेव दरम्यान तिघांचा खात्मा

एनआयएच्या या १५९७ पानांच्या चार्जशीट मध्ये पाकिस्तानचे मारले गेलेले तीन दहशवाद्यांशिवाय हँडलर साजिद जट्ट याचे देखील नाव आहे. फैजल जट्ट उर्फ सुलेमान शाह, हबीब ताहीर उर्फ जिब्रान आणि हमजा हफगाणी यांना श्रीनगरमधील जंगलात झालेल्या ऑपरेशन महादेव दरम्यान संपवण्यात आलं होतं. लष्कर अन् टीआरएफ यांच्याशिवाय पाच आरोपींवर भारतीय न्याय संहितेअंतर्गत आर्म्स अॅक्ट १९६९ आणि युएपीए १९६७ ही कलमे लावण्यात आली आहे.

दोन भारतीय नागरिकांचाही समावेश

एनआयएने भारताविरूद्ध युद्ध पुकारण्याच्या आरोपाखाली दोन स्थानिक लोकं परवेज अहमद आणि बशीर अहमद यांना देखील आरोपी केलं आहे. त्यांना २२ जून रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर दहशतवाद्यांना मदत करणे, त्यांना आसरा देण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

एनआएने केलेल्या वक्तव्यानुसार दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या परवेज अहमद आणि बशीर अहमद यांना २२ जून रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरूद्ध आरोपपत्र देखील दाखल केलं आहे. वक्तव्यानुसार चौकशीदरम्यान या दोन्ही आरोपींनी तीन सशस्त्र दहशतवाद्यांना आसरा दिल्याचे मान्य केलं आहे. त्यांनी ते लष्कर ए तैयब्बा या दहशतवादी संघटनेचे संबंधित असल्याचे देखील कबूल केलं.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २५ जणांचा झाला होता मृत्यू

२२ एप्रिल रोजी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात जवळपास २५ लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर लाँच केलं होतं. भारतानं पाकिस्तानातील आतल्या भागात असलेल्या लष्कर अन् टीआरएफच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले होते. यानंतर पाकिस्तानी सैन्यानं भारतात ड्रोन हल्ल्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. मात्र आपल्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टमने तो हाणून पाडला. अखेर पाकिस्तानने शस्त्रसंधी करण्यासाठी याचना केल्यानंतर भारतानं पाकिस्तानवरील हल्ले थांबवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT