Operation Trashi-I Encounter: रविवारी उशिरापर्यंत सुरू असलेल्या दहशतवादी आणि लष्करी जवानांमधील चकमकीत लष्कराचे आठ जवान जखमी झाले आहे. ही चकमक किश्तवाड जिल्ह्यातील जंगलामध्ये सुरू आहे. ही चकमक अनेक तास सुरू होती. ऑपरशेन त्राशी-आय दरम्यान ज्यावेळी लष्कराचे जवान सोन्नार भागात सर्च ऑपरेशन करत होते. हे ऑपरेशन जम्मू मधील व्हाईट नाईट कॉर्प्स द्वारे राबवण्यात येत होतं. त्यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार करण्यास सुरूवात केली.
व्हाईट नाईट कॉर्प्सने एक्सवर पोस्ट करत या चकमकीची माहिती दिली. 'सध्या सर्च ऑपरशेन सुरू असून अतिरिक्त फोर्स पाठवण्यात आली आहे. या सर्व भागात नाकाबंदी करण्यात आली आहे. या ऑपरेशनमध्ये नागरी प्रशासन आणि विविध सुरक्षा दलांचे सहकार्य मिळत आहे.' असं ट्विट केलं आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन ते तीन परदेशी दहशतवाद्यांशी सर्च ऑपरेशनवर असलेल्या टीमची चकमक उडीली. हे दहशतवादी पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संलग्नित असल्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर अचानक गोळीबार आणि ग्रेनेड हल्ला केला. त्यांनी नाकाबंदी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवानांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्यांच्या मदतीसाठी लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पोलिसांना डिप्लॉय करण्यात आलं आहे. या भागात कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.
दरम्यान, दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये सायंकाळी ५.४० वाजेपर्यंत गोळीबार सुरू होती. यात आठ जवान जखमी झाले आहेत. यातील अनेक जवान हे ग्रेनेडच्या स्प्लिंटरने जखमी झाले आहेत. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यासाठी मोठं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं आहे.
यासाठी अत्याधुनिक सर्व्हेलन्स उपकरणे, जसे की ड्रोन्स स्निफर डॉग्स यांचा देखील वापर केला जात आहे. या वर्षातील जम्मू काश्मीर भागातील लष्कर आणि दहशतवादी यांच्यातील ही तिसरी मोठी चकमक आहे. यापूर्वी काहोग आणि नाजोटे जंगलात चकमकी उडाली होती. ही चकमक ७ जानेवारी आणि १३ जानेवारी रोजी बिलवाड आणि कठुआ जिल्ह्यात झाली होती.
गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी उधमपूर जिल्ह्यातील सोआन गावात झालेल्या चकमकीत एक पोलीस अधिकऱ्याचा मृत्यू झाला होता. यावेळी दहशतवादी दाट धुकं आणि अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.
लष्कराचे सध्या जम्मू भागातील जंगलांमध्ये जोरदार दहशतवादी विरोधी सर्च ऑपरेशन सुरू आहे. त्यानंतर लष्कर आणि दहशतवाद्यांमधील या चकमकी वाढल्या आहेत. हे ऑपरेशन गेल्या डिसेंबर महिन्यापासून सुरू असून जवळपास तीन डझन दहशतवादी या भागात लपल्याचा संशय सैन्य दलांना आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या इंटेलिजन्स इनपूट्सच्या आधारे सुरक्षा दलांनी आपली मोहीम अजून तीव्र केली आहे. पाकिस्तानी हँडलर्स भारतात अजून दहशतवादी पाठवण्याच्या तयारीत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.