Pune Terrorist Arrest: पुण्यात अल-कायद्याशी संबंधित संशयित दहशतवाद्याला अटक, स्टेशनवर उतरण्यापूर्वीच बेड्या

Maharashtra ATS Pakistan-based Al-Qaeda: रेल्वे स्टेशनवर थरारक कारवाई; मोबाईलमधून आयईडी बनविण्याचा फॉर्म्युला असलेली पीडीएफ जप्त
Terrorist Arrested
Terrorist ArrestedPudhari
Published on
Updated on

ATS Pune Techie Arrested linked with Al Qaeda

महेंद्र कांबळे

पुणे : दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारल्याच्या प्रकरणात व राष्ट्रविरोधी कारवाई केल्याप्रकरणात पुण्यात 19 ठिकाणी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) छापेमारी करीत काही जणांकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते. त्याच्या विश्लेषणाअंती अखेर एटीएसने बंदी असलेल्या अल-कायदाशी संबंध आलेल्या संशयित दहशतवाद्याला पुणे रेल्वेस्टेशन परिसरातून कुर्ला-बेंगलोर एक्स्प्रेस या रेल्वेतून उतरण्यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Pune News)

Terrorist Arrested
Pune Water Crisis Janata Vasahat: जनता वसाहतीत 17 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; नागरिक संतप्त, शिवसेनेचे आंदोलन

झुबेर इलियास हंगरगेकर (कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित दहशतवाद्याचे नाव आहे. त्याला बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायद्यानुसार अटक केली आहे. अल-कायदाशी संबंध असल्याप्रकरणात याप्रकरणी एटीएसने नव्याने गुन्हा दाखल केला आहे. दि. 8 एप्रिल 2023 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील अजंठा चौकात असलेल्या एका साडीच्या दुकानावर पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यात या दहशतवाद्यांनी एक लाखाची रोकड चोरी करून नेली होती.

Terrorist Arrested
Deputy Tehsildar Controversy Pune: रजा टाकून बाबू करतोय...बड्या साहेबांची सेवा!

पुणे मोड्यूल प्रकरणातील दहशतवाद्यांना कोथरूडमध्ये पकडल्यानंतर त्यांचा साताऱ्यातील दरोड्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा तपास पुणे एटीएस करत आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने संशयितांकडे केलेल्या चौकशीत नवीन नावे निष्पन्न झाल्याने शहरात 19 ठिकाणी छापेमारी केली होती.

Terrorist Arrested
Balbharati Paud Phata Road: बालभारती ते पौड फाटा रस्ता आराखडा नव्याने तयार होणार; पर्यावरण परवानगी प्रक्रिया लवकरच

दरम्यान, अटक केलेल्या हंगरगेकर याच्या मोबाईलमधून व इलेक्टॉनिक साहित्यातून एटीएसने महत्त्वपूर्ण पीडीएफ फाईल जप्त केल्या आहेत. त्यामध्ये तो अल-कायदा या बंदी असलेल्या संस्थेशी संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, त्याच्याकडे आढळून आलेल्या साहित्यातून तो देशविरोधी कारवाईत गुंतल्याचेही समोर आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या एका पीडीएफमधून बॉम्ब कसा बनवायचा याचा फॉम्युला (आयईडी) सापडला आहे.

Terrorist Arrested
Pune Water Crisis Janata Vasahat: जनता वसाहतीत 17 दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प; नागरिक संतप्त, शिवसेनेचे आंदोलन

आरोपीच्या मोबाईलमधून मिळाल्या पीडीएफ फाईल

झुबेर हंगरगेकर याला अटक करून एटीएसच्या पथकाने न्यायालयात हजर केले. या वेळी त्याला एटीएसबद्दल काही तक्रार आहे का? अशी विचारणा करण्यात आली. त्यावर त्याने एटीएसने आपल्यावर जे गुन्हे दाखल केले आहेत, त्याच्याशी मी असहमत असल्याचे त्याने या वेळी सांगितले. तुम्ही एटीएसने सादर केलेली कॉपी पाहिली का व तुमचे कोणी वकील आहेत का? अशी विचारणा केली. त्यावर त्याने मी रेल्वेने ट्रॅव्हलिंग करत होतो. पुणे रेल्वेस्थानकावर येताच मला एटीएसने पकडून त्याच्या कार्यालयात नेले. मला वकिलाशी संपर्क साधता आला नाही. या वेळी विशेष सरकारी वकील विलास पटारे यांनी युक्तिवाद करताना सांगितले, आरोपीच्या मोबाईलमधून पीडीएफ फाईल मिळाल्या आहेत.

त्यामध्ये अल-कायदा या बंदी असलेल्या संघटनेशी संबंधित माहिती मिळाली आहे. तसेच, आयईडी बनविण्याचा फॉर्म्युलाही त्या पीडीएफमध्ये असल्याचा युक्तिवाद या वेळी करण्यात आला. त्यामुळ यामध्ये आणखी आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी झुबेरला पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. या वेळी आरोपीला वकील नसल्याने त्याला विधीसेवा प्राधिकरणाच्या वतीने वकील देण्यात आला. दरम्यान, न्यायालयाने त्याला 4 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news