

pahalgam terroris attack maharashtra CM Devendra Fadnavis
पुणे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने १०७ पाकिस्तानी नागरिक बेपत्ता होण्याच्या अफवा 'या' पूर्णपणे निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते पुणे येथे माध्यमांशी आज (दि.२७) संवाद साधत होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "गृहमंत्री म्हणून मी स्पष्टपणे सर्वांना सांगू इच्छितो की, या संदर्भातील अफवा पसरवू नयेत. सर्व पाकिस्तानी नागरिकांचे ठावठिकाण आम्ही शोधून काढले आहे आणि त्यांना महाराष्ट्रातून त्यांच्या देशात परत पाठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे."
ते पुढे म्हणाले, "योग्य त्या सर्व व्यवस्था करण्यात येत असून, कोणताही पाकिस्तानी नागरिक येथे थांबणार नाही. माझा अंदाज आहे की, आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्याच्या सकाळपर्यंत सर्वजण भारतातून परत जातील. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर नागरिकांमध्ये पसरलेल्या संभ्रमाला पूर्णविराम मिळाला असून, प्रशासनाकडूनही अधिकृत हालचालींना गती देण्यात आली असल्याचे देखील ते म्हणाले".