राष्ट्रीय

मकर संक्रांतीनिमित्त उद्या एक कोटी लोक करणार सूर्य नमस्कार : केंद्रीय मंत्री सोनोवाल

अनुराधा कोरवी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सव आणि मकर संक्रांतीचे औचित्य साधत उद्या शुक्रवारी (दि.१४) रोजी देशभरात एक कोटी लोक सूर्य नमस्कार करणार आहेत. सूर्य नमस्कार कार्यक्रमात ७५ लाख लोक सामील होण्याचा अंदाज आहे, मात्र, ही संख्या एक कोटींच्या पुढे जाईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

सूर्य नमस्कारामुळे मानवाच्या शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, असे सर्वानंद सोनोवाल यांनी नमूद केले. तसेच सूर्य नमस्कार कार्यक्रमात भारतीय योग संघ, राष्ट्रीय योग क्रीडा संघ, योग प्रमाणन बोर्ड, फिट इंडिया तसेच विविध सरकारी, गैर-सरकारी संस्था सामील होणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी आहे.

हेही वाचलंत का? 

SCROLL FOR NEXT