कल्याण- डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना कोरोना | पुढारी

कल्याण- डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना कोरोना

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा: कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांना कोरोना झाल्याची माहिती मिळाली आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असून सध्या ते त्यांच्या कल्याण येथील राहत्या घरातच उपचार घेत आहेत.

कल्याण डोंबिवली पालिकेतील जवळपास ७५ टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांनी दिली. डॉ. विजय सुर्यवंशी यांनी नुकताच बूस्टर डोस घेतल्याने त्यांना ताप येत होता. यानंतर त्याचा ताप एक दिवसानंतर देखील उतरत नसल्याने त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा अहवाल आज बुधवारी (दि.१२) रोजी पॉझिटिव्ह आला.

याशिवाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांची कोरोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली आहे. कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे.

हेही वाचलत का? 

Back to top button