राष्ट्रीय

New Delhi : पंतप्रधान संग्रहालयाचे आज होणार उद्घाटन

backup backup

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्यापासूनच्या सर्व पंतप्रधानांची माहिती देणार्‍या पंतप्रधान संग्रहालयाचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. विचारसरणी आणि कालावधी याचा विचार न करता सर्वोच्च पदापर्यंत गेलेल्यांचा आदर म्हणून हे संग्रहालय उभे करण्यात आले असल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जे पंतप्रधान झाले, त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची माहिती संग्रहालयात प्रदर्शित केली जाणार आहे. सर्व पंतप्रधानांचे नेतृत्वगुण, त्यांची दृष्टी आणि त्यांनी साध्य केलेली कामगिरी याची माहिती युवकांना व्हावी, हा देखील दृष्टीकोन संग्रहालय उभारणीमागे आहे.

दिल्लीतील तीन मूर्ती कॉम्प्लेक्समध्ये सुमारे 271 कोटी रुपये खर्च करून हे संग्रहालय उभारण्यात आले आहे. आतापर्यंत झालेल्या चौदा पंतप्रधानांची माहिती संग्रहालयात दिली जाणार असून भविष्यात जे पंतप्रधान होतील, त्यांची माहिती देण्यासाठी संग्रहालयात पुरेशी जागा असल्याचे सांस्कृतिक मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. याआधी असलेल्या नेहरु संग्रहालयाजवळ नवी वास्तू बांधून त्याला पंतप्रधान संग्रहालय असे नाव देण्यात आले आहे. या परिसरातील ब्लॉक 1 हा नेहरु संग्रहालय म्हणून ओळखला जाईल.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT