देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ | पुढारी

देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत सौम्य वाढ नोंदवण्यात आली आहे. मंगळवारी दिवसभरात १ हजार ८८ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान १ हजार ८१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. बुधवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७६ टक्के, तर दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.२५ टक्के नोंदवण्यात आला.

देशातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आता १० हजार ८७० (०.०३ टक्के) वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ कोटी ३० लाख ३८ हजार १६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ४ कोटी २५ लाख ५ हजार ४१० रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २१ हजार ७३६ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.

देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १८६ कोटी ७ लाख ६ हजार ४९९ डोस लावण्यात आले आहेत. यातील २.३२ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहे. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत २ कोटी ४७ लाख ७० हजार ४७५ बूस्टर डोस लावण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून आतापर्यंत पुरवण्यात आलेल्या १९१ कोटी १९ लाख ४० हजार ९९५ डोस पैकी १९ कोटी ८८ लाख ३१ हजार ८२६ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात आतापर्यंत ७९.४९ कोटी कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख २९ हजार ३२३ तपासण्या मंगळवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button