Congress MP Suspended pudhari photo
राष्ट्रीय

Congress MP Suspended: लोकसभेत कागद भिरकावणे पडले महागात... काँग्रेसचे खासदार निलंबित

Anirudha Sankpal

Naravane Row Congress MP Suspended: लोकसभा पीठासीन अधिकाऱ्यांनी काँग्रेसह विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या आठ खासदारांमध्ये ७ खासदार एकट्या काँग्रेसचे आहेत. गेल्या दोन दिवसांपासून राहुल गांधींनी निवृत्त लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला देत देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर वक्तव्ये केली होती.

त्यानंतर सत्ताधारी अन् विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये संसदेत मोठा गदारोळ सुरू होता. त्यातच आज सभागृह सुरू असताना सभागृहात कागद भिरकावण्यात आले. यानंतर लोकसभा स्पीकर यांनी बुधवारपर्यंत कामकाज स्थगित केलं. दरम्यान, या निर्णयाविरूद्ध राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी संसद परिसरात प्रदर्शन केलं.

मंगळवारी (३ फेब्रुवारी) लोकसभेत विविध मुद्यांवर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अचानक गोंधळ घालणे सुरू केले. विरोध पक्षाचे खासदार स्पीकरच्या आसनाजवळ आले आणि त्यांनी कागद भिरकावले. यानंतर स्पीकरने कारवाई करत तीन वाजेपर्यंत संसद सत्र स्थगित केलं होतं.

आवाजी मतदानाने प्रस्ताव पास

त्यानंतर ज्यावेळी लोकसभेचे कामकाज तीन वाजता सुरू केले त्यावेळी संसदीय कार्य मंत्री किरण रिजितू यांनी ज्या सदस्यांनी पेपर भिरकावले त्यांना बाकी सत्रासाठी निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर तो प्रस्ताव आवाजी मतदानाने पास करण्यात आला.

कोण कोण झालं निलंबित?

यानंतर स्पीकर यांनी संसदीय नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मणिकम टॅगोर, गुरजीत औजला, राजा वडिंग, हिबी ईडन, किरण रेड्डी, प्रशांत पोडोले, व्यंकट रमण आणि डीन कुरियोकोज यांना उर्वरित अर्थसंल्पीय अधिवेशनातून निलंबित केलं. मात्र हा प्रस्ताव पास झाल्यानंतरही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कागद भिरकावणे सुरूच ठेवले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT