Moon Dogs: सेंट पीटर्सबर्गमध्ये एकाचवेळी ४ चंद्र दिसण्याचं कारण काय?

Anirudha Sankpal

आकाशात एकाच वेळी अनेक चंद्र किंवा सूर्य दिसण्याच्या या दुर्मिळ नैसर्गिक घटनेला विज्ञानात 'पॅरासेलीन' (Paraselene) किंवा 'मून डॉग्स' (Moon Dogs) असे म्हणतात.

ही घटना प्रामुख्याने वातावरणातील बदलांमुळे घडते आणि तो एक प्रकारचा प्रकाशाचा भास असतो.

जेव्हा वातावरणात उंचावर असलेल्या 'सिरस' ढगांमध्ये बर्फाचे छोटे षटकोनी स्फटिक (Ice Crystals) तयार होतात, तेव्हा हे घडते.

चंद्राचा प्रकाश जेव्हा या बर्फाच्या स्फटिकांमधून प्रवास करतो, तेव्हा त्याचे वक्रीभवन (Refraction) होते.

या वक्रीभवनामुळे मूळ चंद्राच्या दोन्ही बाजूंना प्रकाशाची दोन किंवा अधिक चकचकीत वर्तुळे किंवा ठिपके तयार होतात.

रशियासारख्या अतिथंड प्रदेशात हवेत बर्फाचे कण मोठ्या प्रमाणात असल्याने ही घटना स्पष्टपणे पाहायला मिळते.

हे दिसणारे अतिरिक्त चंद्र म्हणजे दुसरे काही नसून चंद्राचीच प्रकाशीय प्रतिबिंबं असतात, जी हुबेहूब चंद्रासारखी भासतात.

सामान्यतः ही घटना अतिशय थंड वातावरणात आणि जेव्हा चंद्र क्षितिजाच्या जवळ असतो, तेव्हाच अनुभवायला मिळते.

ही कोणतीही दैवी शक्ती नसून केवळ प्रकाशाच्या परावर्तनाचा आणि वक्रीभवनाचा एक सुंदर चमत्कार आहे.

येथे क्लिक करा