Crime News Pudhari
राष्ट्रीय

UP crime news| भयंकर आणि हृदयद्रावक..! पाषाणहृदयी आईने आवळला चिमुरडीचा गळा; पोटच्या १० वर्षांच्या मुलाने शूट केला व्हिडिओ!

shocking crime news | पती-पत्नीमधील वाद चिमुकलीच्‍या जीवावर बेतला, आरोपी महिला पोलिसांच्‍या ताब्‍यात

पुढारी वृत्तसेवा

UP crime news

पती आणि पत्नीमध्ये वाद सुरू झाला. रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. यावेळी चार वर्षांची निष्पाप चिमुकली रडू लागली. तेव्हा तिची आई तिला गप्प करायची. घरातलं वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण होतं आणि रात्री १२ वाजेपर्यंत हा वाद चालूच होता. पाषाणहृदयी आईने चिमुकलीला गप्प करण्यासाठी थेट तिचा गळाच आवळला. ही भयंकर आणि हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यातील आटा परिसरातील अकबरपूर इटौरा गावात घडली. धक्कादायक बाब म्हणजे, ही घटना घडत असताना तिच्या १० वर्षांच्या मुलाने मोबाईलमध्ये याचा व्हिडिओ बनवला. सध्या पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून तिची चौकशी सुरू आहे.

पती-पत्नीमध्ये वाद

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, विनिता आणि तिचा पती राजकुमार यांच्यात आर्थिक कारणावरून वाद सुरू झाला होता. हा वाद रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. यानंतर राजकुमार आपल्या दोन मुलांसह दुसऱ्या खाटेवर झोपायला गेला, तर विनिता तिची मुलगी नैनाला घेऊन दुसऱ्या बाजूला झोपली.

आईने गमछ्याने मुलीचा गळा आवळला

पहाटे दोनच्या सुमारास विनिता उठली आणि झोपलेल्या नैनाला जमिनीवर घेऊन गेली. तिथे तिने एका गमछ्याने मुलीचा गळा आवळला. चिमुरडीचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तिने तिला जमिनीवर झोपवून ही क्रूर घटना घडवून आणल्याची शंका व्यक्त केली जात आहे. नैनाच्या मृत्यूनंतर घरात पूर्ण शांतता पसरली. काही वेळाने राजकुमार याला जाग आली. त्याने मुलीला मृत अवस्थेत पाहिले. त्यांनी आक्रोश केला. चिमुकलीच्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. राजकुमार रात्री उमंग (१०) आणि मयंक या दोन मुलांसह झोपले होते. पत्नी विनिता दुसऱ्या खाटेवर मुलगी नैना (४) हिच्यासोबत झोपली होती. राजकुमारच्या आरोपानुसार, त्याची पत्नी गेल्या दोन दिवसांपासून माहेरी जाण्याचा हट्ट करत होती. मात्र, पैसे नसल्याचे सांगून त्याने तिला नकार दिला होता.

विनिताने जमिनीवर अंथरली होती लाल साडी

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आई विनिताने गमछ्याचा तुकडा फाडून मुलीच्या गळ्याला बांधला व तो घट्ट आवळला. आईच्या कुशीत बाळ स्वतःला सर्वात सुरक्षित समजतं, त्याच आईने तिचा जीव घेतला, या विचाराने गावकरी सुन्न झाले आहेत. घटनेपूर्वी विनिताने जमिनीवर लाल साडी अंथरली होती, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर ती नैनाला कडेवर उचलून तिथे घेऊन गेली. घटनेनंतर मुलीचा मृतदेह त्याच साडीवर पडलेला आढळून आला. हे हृदयद्रावक दृश्य पाहून गावातील महिलांचे डोळे पाणावले.

मुलगा उमंगने बनवला व्हिडिओ

रात्री सर्वजण झोपल्यानंतर विनिताने मुलीला संपवले. वीज गेल्यामुळे जेव्हा राजकुमारला जाग आली, तेव्हा त्याने पाहिले की मुलगी जमिनीवर पडली आहे आणि विनिता तिथे बसून तिचा गळा आवळत आहे. याच दरम्यान मुलगा उमंगने मोबाईल काढून याचा व्हिडिओ बनवला. शवविच्छेदन अहवालात गळ्याचे हाड तुटल्यामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT