Madhya Pradesh crime: बापानं आईला ठेचून मारलं... २ वर्षाच्या मुलाला जंगलात सोडलं.. जीव वाचवायला चिमुकला २० तास अनवाणी चालला

Madhya Pradesh crime
Madhya Pradesh crimepudhari
Published on
Updated on

Child survives 20 hours in forest: पायात ना कपडा ना चप्पल.. अशा परिस्थितीत दोन वर्षाचा चिमुकला घनदाट जंगलातून तब्बल २० तास चालतो. हिंस्त्र जणावरांनी भरलेल्या या जंगलातून तो वाट काढत आपला जीव वाचवतो. ही ह्रदयद्रावक घटना ही मध्य प्रदेशातील आहे. जिथं एका नराधम बापानं या चिमुकल्याच्या आईला जीवे मारलं. त्यानंतर त्या मुलाला एका अज्ञात ठिकाणी सोडून गेला.

Madhya Pradesh crime
Murder Mystery | प्रेमाचा करुण अंत की पैशांची हाव? प्रेयसी आणि तिच्या मुलाच्या मृत्यूची अंगावर काटा आणणारी कहाणी

नराधम बापाला अटक

रविवारी पोलिसांना एक अशक्त आणि डिहायड्रेट झालेली चिमुकला विदिशा भागात आढळून आला. यानंतर पोलिसांनी चिमुकल्याच्या वडिलांना अटक केली. चिमुकला इतकी भुकेला अन् तहानलेला होता की त्याने पोलिसांच्या हातून जेवण आणि पाणी हिस्कावून घेतलं. त्यानंतर या मुलाला रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

दरम्यान, बेगुमगंजच्या एसडीपीओ सोनाली गुप्ता यांनी सांगितलं की, हा चिमुकला वाचला हा एक मोठा चमत्कार आहे. ज्या भागात हा चिमुकला सापडला होता. तेथून २ किलोमीटर अंतरावर त्याला फेकून देण्यात आलं होतं.

Madhya Pradesh crime
Daughter Killed Mother: धक्कादायक! बॉयफ्रेंडवर उडवायला पैसे दिले नाहीत म्हणून जन्मदात्या आईलाच अल्पवयीन मुलीनं संपवलं

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री विदिशा जिल्ह्यातील हैदरगड भागातील एका गावात राहणाऱ्या मुलाच्या २५ वर्षाच्या वडिलांनी त्याच्या आईला दगडानं ठेचून मारलं. त्यावेळी मुलगा देखील तिच्यासोबत होता. पत्नीला मारल्यानंतर या नराधमानं मुलाला मोटरसायकलवरून रायसेन जिल्ह्यातील बेगुगंज भागातील घनदाट जंगल भागात सोडून दिलं. त्याने एका मंदिराजवळ या मुलाला सोडून दिलं होतं. तिथंच त्याने आपली मोटरसायकल देखील सोडून दिली. या भागात हिंस्त्र जनावरांचा वावर असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळं हे मुल वाचणं खूपच कठीण होतं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आधी महिलाचा मृतदेह शोधण्यात आला. त्यानंतर या नराधमाला अटक करण्यात आली आहे. सुरूवातीला या नराधमाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या मुलाला जंगलात सोडून दिल्याचं देखील मान्य केलं नाही. यामुळं या मुलाच्या शोधकार्यात देखील विलंब झाला.

Madhya Pradesh crime
Crime News: पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; ब्लॅकमेलिंगला कंटाळून प्रियकरानेच केली प्रेयसीची निर्घृण हत्या

...आणि शोधमोहीम सुरू झाली

ज्यावेळी तपास पुढे सरकला आणि पोलिसांनी कुटुंबातील इतर सदस्यांशी संपर्के केला तसे त्यांना २ वर्षाचे मुल बेपत्ता असल्याचं समजलं. तोपर्यंत अंधार पडला होता. अनेक टीम या भागात मुलाला शोधण्यासाठी पाठवण्यात आल्या. पोलिसांनी ही पथके जंगल, शेत आणि पाण्याच्या ठिकाणी पाठवले.

गुप्ता म्हणाल्या, 'आम्ही या भागात सतत तपास केला. रविवारी जवळपास ८.३० वाजता आम्हाला एक क्षीण आवाज ऐकू आला. आम्हाला एक मुलगा चालत येत असल्याचं दिसलं. गुप्ता यांनी सांगितलं की हा मुलगा जवळपास संपूर्ण रात्र चालत असणार. जिथं या मुलाला टाकून दिलं होतं तिथं घनदाट झाडी होती. रात्रीची व्हिजिबिलिटी देखील कमी होती. तसेच जनावरांचा देखील वावर या भागत आहे. मात्र या चिमुकल्याच्या धाडसापुढं तेही त्याच्या आडवे आले नाहीत. जिवंत राहण्यासाठीचा त्याला लढा जबरदस्त आहे आणि तो त्याच्या आईच्या खुनाचा एकमेव साक्षीदार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news