Maximum Sim Cards per Person in India
देशातील टेलिकॉम कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता देशातील एका नागरिकाला त्याच्या नावावर फक्त ९ सिमकार्ड मिळणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर ९ सिमकार्ड असतील तर त्याला १० वे सिमकार्ड मिळणार नाही.
सरकारने एका व्यक्तीकडे किती सिम कार्ड असावे याबाबतचे नियम कडक केले असून २४ ऑगस्टपासून टेलिकॉम कंपन्यांना ज्या व्यक्तीकडे ९ सिमकार्ड आहेत त्यांना नवीन सिमकार्ड देणे बंद करण्यास सांगितलं आहे. याबाबतची माहिती पीटीआयने दिली आहे.
सिमकार्ड मर्यादा ही काही नवी गोष्ट नाहीये. डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने प्रती व्यक्ती ९ सिम कार्ड विकण्यावर कॅप टाकला होता. हा दहा वर्षापूर्वीच टाकण्यात आलेला कॅप होता. हे नियम देशातील इतर भागांसाठी ९ सिमकार्डचा होता तर जम्मू काश्मीर आणि आसाम, नॉर्थ ईस्टच्या काही राज्यात ही मार्यादा ६ होती.
आता सरकार हे लिमिट टेलकॉम कंपन्यांकडूनच पाळलं जावं यासाठी प्रयत्न करत आहे. टेलिकॉम कंपन्यांना आता त्यांच्या ग्राहकांकडे किती सिमकार्ड कनेक्शन आहेत याची पडताळणी करावी लागणार आहे. ज्या ग्राहकांनी ही मर्यादा आधीच पार केली आहे त्यांना नवे सिम कार्ड सहजासहजी मिळू नये याची काळजी घेतली जाणार आहे.