Maruti e-Vitara launch:
भारतीय मार्केटमध्ये आता इलेक्ट्रिकल बाईक्स पाठोपाठ इलेक्ट्रिकल कार्सची मागणी देखील वाढू लागली आहे. अनेक कार उत्पादन कंपन्या आपल्या इलेक्ट्रिक कार्स लाँच करत आहेत. मात्र या स्पर्धेत मारती सुझुकी मात्र थोडी मागे होती. हायब्रीड गाड्यांवर भर असलेल्या मारुती सुझुकीनं देखील आपली इलेक्ट्रिक कार भारतात लाँच करणार आहे. मारूती आपली Maruti e-Vitara भारतात लाँच करण्याच्या तयारी आहे.
मारूतीनं आपली Maruti e-Vitara ही भारतात लाँच करण्यापूर्वी विदेशात लाँच केली आहे. मारूतीनं या गाड्यांचे उत्पादन हे गुजरातच्या हंसलपूर मधील प्लांट मध्ये करत आहे. गेल्या २६ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्लांटच्या नव्या हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडच्या स्थानिक उत्पादनाचे उद्घाटन केलं होतं. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Maruti e Vitara चे फ्लॅग ऑफ केलं होतं. त्यानंतर ही गाडी एक्सपोर्ट होण्यास सुरूवात झाली.
मारूतीने आपली ही इलेक्ट्रिकल गाडी १०० पेक्षा जास्त देशात निर्यात करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. मारूतीनं २०२६ या वर्षात ६७ हजार इलेक्ट्रिक गाड्यांचे उत्पादन करण्याचं टार्गेट ठेवलं आहे. आतापर्यंत कंपनीनं Maruti e Vitara च्या जवळपास ७ हजार युनिट एक्सपोर्ट केले आहेत. ही गाडी जपान, युरोपसह अनेक देशात पोहचली आहे.
लांबी 4,275 मिमी
रूंदी 1,800 मिमी
उंची 1,635 मिमी
व्हीलबेस 2,700 मिमी
ग्राउंड क्लिअरन्स 180 मिमी
आंतरराष्ट्रीय बाजारात विकली गेलेली e Vitara दोन बॅटरी पर्यायात उपलब्ध आहे. यात 49kWh आणि 61kWh ची क्षमता असलेल्या बॅटरींचा समावेश आहे. दोन्ही बॅटरी या फ्रंट माऊंटेड इलेक्ट्रिक मोटरला पॉवर देतात. 61kWh बॅटरी ही दुसऱ्या मोटरसोबत देखील जोडता येते. त्यामुळं 61kWh बॅटरी असणारी गाडी ही ऑल व्हील ड्राईव्ह असणार आहे. कंपनीनं याला ऑल ग्रीप ई असं नाव दिलं आहे.
49kWh - फ्रंट व्हील - 144hp - 344 किमी
61kWh - फ्रंट व्हील - 174hp - 428 किमी
61kWh - ऑल-व्हील - 184hp - 394 किमी
हे रेंजचे आकडे हे वर्ल्डवाईड हार्मोनाईज्ड लाईट व्हेईकल टेस्ट प्रोसिजर (WLTP) नुसार आहेत. भारतात मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये ही कार शोकेस करण्यात आली आहे. त्यावेळी मारूतीनं त्यांची e-Vitara ही ५०० किलोमीटरपर्यंत रेज देते असा दावा केला होता.
मारूती भारतात सुरूवातीला फक्त फ्रंट व्हील ड्राईव्ह व्हेरिएन्ट लाँच करणार आहे. ऑल व्हील ड्राईव्ह व्हेरिएन्ट ही नंतर लाँच केलं जाईल असं कंपनीनं सांगितलं आहे.
यात एका सिंगल ग्लास पॅनेलखाली डुअल-स्क्रीन सेटअप मिळतो.
मात्र, इन्स्ट्रुमेंट डिस्प्लेची ऑफसेट (Off-set) पोझिशनिंग थोडी वेगळी किंवा विचित्र वाटू शकते.
तरीही, संपूर्ण मांडणी (Layout) फंक्शनल आहे आणि बहुतेक कंट्रोल्स सहजपणे हातात येतात.
कंपनी यामध्ये पुढील हवेशीर सीट्स (Front Ventilated Seats) देत आहे.
ऑटो होल्डसह इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक (Electronic Parking Brake).
AWD (ऑल-व्हील ड्राइव्ह) वर्जनसाठी ‘ट्रेल’ मोडसह विविध ड्राइव्ह मोड.
हिल डिसेंट कंट्रोल (Hill Descent Control).
सिंगल-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल (Single-zone Auto Climate Control).
वायरलेस फोन चार्जर.
३६०-अंशांचा कॅमेरा (360-degree Camera).
कीलेस एंट्री.
पावर्ड ड्रायव्हर्स सीट (Powered Driver's Seat).
सनरूफ (Sunroof).
सबवूफरसह इन्फिनिटी ऑडिओ सिस्टम (Infinity Audio System).
सुरक्षा फीचर्स (Safety Package)
७ एअरबॅग्ज (7 Airbags).
लेव्हल-२ ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (Level-2 ADAS).
मारूतीनं लाँचपूर्वी Maruti e Vitara च्या किंमतीबाबत गुप्तता पाळली आहे. त्यामुळं लाँचपूर्वीच त्याच्या किंमतीचा अंदाज लावणं धाडसाचं ठरेल. मात्र मारूतीसाठी या ई कारची किंमत ही मोठे आव्हान असणार आहे.
भारतीय ग्राहकांमध्ये मारूतीची प्रतिमा ही एक स्वस्त गाडी देणारी कंपनी अशी राहिली आहे. त्यामुळं लोकं मारूतीच्या या ई कारच्या किंमती बाबत प्रचंड उत्सुक आहेत. मारूतीनं आपल्या स्पर्धक कंपन्यांपेक्षा आपल्या गाड्यांच्या किंमती नेहमीच कमी ठेवल्या आहेत.
आशा आहे की मारूती आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारची किंमत ही १८ ते १९ लाखाच्या आसपास ठेवेल. मात्र Maruti e Vitara हाय व्हेरिएन्ट हे २५ लाख रूपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.