Kargil War 1999 Story pudhari
राष्ट्रीय

Kargil War 1999 Story: भारतीय सेनेच्या कर्नलने आधी केली तुफान फायरिंग... नंतर पाकिस्तानच्या अधिकाऱ्याला का दिली कॅडबरी?

Anirudha Sankpal

Kargil War Story: भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९९९ च्या उन्हाळ्यात कारगिलचे युद्ध झाले होते. जवळपास ८५ दिवस चाललेल्या या युद्धात दोन्ही बाजूंनी तुफान गोळाबारी झाली होती. अखेर २६ जुलै १९९९ मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानी सेनेला या भागातून पळवून लावलण्यात यश मिळवलं होतं.

या युद्धावेळी भारत पाकिस्तान सैन्यात तुफान लढाई झाली होती. मात्र या लढाईत देखील असे काही मानवी मनाला साद देणारे क्षण घडले होते. असाच एक किस्सा भारताच्या रिटायर्ड कर्नल राजिंदर कुमार शर्मा यांनी आपल्या पुस्तकात लिहिला आहे. यात कसं पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्याने त्यांना सिगारेट ऑफर केली होती अन् त्यांनी या पाकिस्तानी अधिकाऱ्याला चॉकलेट दिलं याचा किस्सा सांगितला आहे.

शूरवीर पुस्तकातील किस्सा

राजिंदर कुमार शर्मा यांचा हा किस्सा शूरवीर या पुस्तकात लिहिला आहे. कर्नल राजिंदर कुमार शर्मा हे आपल्या सहकारी आणि मित्रांमध्ये राज या नावाने प्रसिद्ध होते. कर्नल राजिंदर कुमार यांना किर्ती चक्र, शौर्य चक्र आणि सेना मेडल्स मिळाले आहेत. त्यांना ही पदके २००६ ते २००९ या आपल्या नॉर्थईस्टच्या टेन्युअरमध्ये मिळाली आहेत.

दरम्यान, कर्नल शर्मा यांनी इंडियन एक्सप्रेसची बोलताना जुलै १९९९ मधील एक किस्सा सांगितला. त्यावेळी ते युवा ल्युटेनंट होतं. ते २२ ग्रेनेडियर्स बटालीयनचा भाग होते. ते हैदराबादवरून कारगिलकडे रवाना झाले होते.

पाकिस्तानी बंकर दिसला अन्...

शर्मा हे एका छोट्या तुकडीचे नेतृत्व करत होते. यात एक ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि नऊ जवान पॉईंट ५४६५ कडे निघाले होते. हा पाईंट १७ हजार फूट उंचीवर होता. मात्र त्यावेळी ते कनूल इथं पाकिस्तानी गोळीबारात अडकले.

राजिंदर कुमार शर्मा सांगतात, 'आम्ही पॉईंड ५४६५ कडे जात असताना मी एक पार्टी बेसकडे डिप्लॉय केली होती. ही आमची रणनिती होती. आम्ही आमची शस्त्रे अशा प्रकारे ठेवली होती की पाकिस्तानी बंकर्सचा कमकुवत भाग आमच्या सहज टप्प्यात येईल.'

शर्मा पुढे म्हणतात, पाकिस्तानी ट्रुप्स त्यांचा बंकर तयार करत होते. तसं बघायला गेलं तर ते उघड्यावरच होते. जर त्यांनी हल्ला केला असता तर त्यांची धुळदान करण्याचा आमची रणनिती होती. आम्ही खूप दारूगोळा डिप्लॉय केला होता. आमचे सर्व ट्रुप्स हे सतर्क होते.

पाकिस्तानी बंकरवर तुफान फायरिंग

फायरिंग सुरू झाल्यावर आम्ही देखील तुफान फायरिंग केली. त्यात त्यांचे खूप नुकसान झाले. मी हे सर्व माझ्या दुर्भिणीतून पहात होतो. दोन ते तीन मिनिटांची फायरिंग झाल्यावर शर्मा यांनी पाहिलं की कोणीतरी पांढरं निशान फडकवत आहे. याचा अर्थ दुसऱ्या पार्टीला फायरिंग थांबवायची आहे आणि त्यांना चर्चा करायची आहे.

पुस्तकात लिहिल्याप्रमाणे नायब सुभेदार अभय यांनी शर्मा यांना कोणत्याही परिस्थिती पाकिस्तानी लोकांवर विश्वास ठेवून नका असे म्हणत होते. मात्र शर्मा यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि जर शत्रूला चर्चा करायची असेल तर त्यांनी खुल्या जागेत यावं असं सांगितलं.

यानंतर पाकिस्तानी बंकरमधून तीन ते चार सैनिक बाहेर आले. त्यांनी हातात पांढरे निशान पकडले होते. ते आमच्यावर हल्ला करू नका असे ओरडत होते.

थेट गोळीबार करण्याचे आदेश

शर्मा यांनी आपल्या ट्रुप्सना घाबरून जाऊ नका असं सांगितलं. जर शत्रूने काही आगळीक केलीच तर तुम्ही फायर खोला असं सांगितलं होतं.

यावेळी लान्स नायक तुला राम यांनी शक्कल लढवत त्याची पांढरी अंतरवस्त्रे बाहेर काढून ती शत्रूला पांढरे निशान म्हणून दाखवली. त्यानंतर ते शर्मा यांच्यासोबत स्वतःहून पुढे आले. रेडिओ ऑपरेटर ग्रेनेडियर हरिनंदन यांनी शर्मा यांना टायगर आणि लॅम यांच्याशी रेडिओवरून बोला आणि पुढं जाऊ नका असं सांगितलं. शर्मा यांनी त्यांना रेडिओ ऑफ करायला सांगितला.

पाकिस्तान्यांना काय चाललं आहे याबाबत गोंधळ निर्माण झाला. त्यांनी ओरडायला सुरूवात केली की फक्त दोघं या फक्त दोघं या. यावेळी शर्मा यांना आपली दोन लोकं पोजिशन घेऊन तयार आहेत असं दिलं. त्यानंतर शर्मा आणि तुला राम हे ५० मीटर पुढे चालत गेले.

त्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी फक्त एका अधिकाऱ्याला पुढे येण्यास सांगितलं. शर्मा यांनी तुला राम यांना पाठिमागे थांबण्यास सांगितलं. त्यानंतर शर्मा हे उंच पाकिस्तानी अधिकारी मेजर जावेद यांना भेटले. शर्मा यांनी कॅप्टन आरके अशी ओळख करून दिली.

सिगारेट अन् चॉकलेटची देवाण घेवाण

शर्मा यांनी सांगितलं की आम्ही पॉईंट ५४६५ कडे जात आहोत. जर आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही त्याचे प्रत्युत्तर देऊ असं सांगितलं. पाकिस्तानी अधिकारी हसला आणि त्याला आमची अटी मान्य होत्या. त्यानंतर त्यानं मला सिगारेट ऑफर केली. शर्मा देखील हसले आणि त्याच्याकडे लायटर मागितलं. जावेद यांनी ते लायटर दिलं.

शर्मा यांनी याच्या बदल्यात जावेद यांना कॅडबरी चॉकलेट दिलं. ही कॅडबरी कॅप्टन बीएम करिअप्पा यांनी त्यांना पॉईंट ५२०३ वर इमर्जन्सी राशन म्हणून दिली होती.

यानंतर जावेद यांनी आमचं खूप नुकसान झालं आहे असं सांगितलं. भारताने फायर का खोललं असं तो विचारू लागला. त्यावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही पहिल्यांदा फायर खोललं आम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं. थोडं थांबल्यानंतर मेजर जावेद यांनी मला सिगारेट ऑफर केली आम्ही ती ओढळी अन् मी त्यांना म्हणालो की ते या भागात का बसले आहेत. तुम्हाला अजून दोन किलोमीटर मागे असायला हवं असं सांगितलं.

जावेद यांनी भारताचा मेसेज आमच्या हेडक्वार्टरपर्यंत पोहचवतो असं आश्वासन दिलं. त्याने शर्मा यांना फायर पुन्हा उघडू नका असं सांगित आम्ही देखील आदेशाचे पालन करणारे सैनिक आहात असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT