Bees Attack pudhari photo
राष्ट्रीय

Bees Attack: दुर्दैवी! आंगणवाडीच्या २० मुलांचा मधमाशांच्या हल्ल्यापासून वाचवताना महिलेने गमावला स्वतःचा जीव

सोमवारी आंगणवाडीतील मुलांवर मधमाशांनी हल्ला केला होता. त्यावेळी कंचन बाई यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

Anirudha Sankpal

Bees Attack Anganwadi Cook Death: मध्य प्रदेशातील नीचम जिल्ह्यातील एका आंगणवाडी कूकने २० मुलांचा जीव वाचवताना आपला जीव मात्र गमावला. या कूकचं नाव कंचन बाई मेघवाल असून त्या माधवाडा पंचायतमधील रानपूर गावच्या आंगणवाडी केंद्रात कार्यरत होत्या.

या आंगणवाडीमधील मुले बाहेर खेळत असताना त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला होता. मात्र कंचन बाई यांनी आपल्या जीवाची परवा न करत या मुलांना वाचलं.

मुलांना वाचवण्याची धडपड

सोमवारी आंगणवाडीतील मुलांवर मधमाशांनी हल्ला केला होता. त्यावेळी कंचन बाई यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांनी मुलांना वाचवण्यासाठी ताडपत्री आणि चटईचा वापर केला. त्यांनी सर्व मुलांना त्यामध्ये गुंडाळले आणि आंगणवाडीच्या आत आणलं. मात्र मुलांना वाचवत असताना कंचन बाई यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला. त्यांना शेकडो डंख मारण्यात आले.

अन् कंचनबाई बेशुद्ध पडल्या

मधमाशांच्या या शेकडो डंखांमुळे कंचनबाई मेघवाल या शाळेतच बेशुद्ध येऊन पडल्या. गावातील लोकांना या घटनेबाबत माहिती मिळतात त्यांनी आंगणवाडीकडे धाव घेतली त्यावेळी त्यांना बेशुद्ध पडलेल्या कांचनबाई दिसल्या. माहिती मिळताच कॉन्स्टेबल कालूनाथ आणि पायलट राजेश राठोड हे देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनी सर्वांनी मिळून कंचनबाई यांना आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र तिथं डॉक्टरांनी तपासणी करून कंचनबाई यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं.

कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी

कंचनबाई या रानपूर गावातील मुलांसाठी फक्त आंगणवाडी कर्मचरी नव्हत्या. त्या मुलांसाठी दुपारचं जेवण तयार कर होत्या. त्याचबरोबर त्या जय माता दी सेल्फ हेल्प ग्रुपच्या अध्यक्षा देखील होत्या. त्या एकट्या आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होत्या. त्यांचे पती शिवलाल हे आजारीच असतात.

गावात भीतीचे वातावरण

कंचनबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मंगळवारी ज्यावेळी त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर पार्थिव गावात आणलं गेलं त्यावेळी संपूर्ण गाव भावूक झालं होतं. त्यांनी दाखवलेल्या धाडसाचे वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडत होते.

गावातील या घटनेनंतर दहशतीचे वातावरण आहे. गावात एकच हँडपंप असून याच हँडपंपाजवळ मधमाशांनी हल्ला केला होता. आता लोक या हँडपंपमधून पाणी काढण्यासाठी देखील जायला घाबरत आहेत. गावातील लोकांनी मधमाशाचे पोळे त्वरित हटवण्यात यावे अशी मागणी केली आहे. त्याचबरोबर त्यांनी कंचनबाईंच्या कुटुंबियांना अर्थिक मदत करण्यात यावी अशी देखील मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT