पुढारी वृत्तसेवा
मधमाशीने दंश केला तर तो क्षण खूप वेदनादायी असू शकतो. शरीरात जळजळ, सूज आणि तीव्र वेदना जाणवू लागतात.
वास्तविक मधमाशीच्या डंखाने त्वचेत विष निघते.
यामुळे सूज, लालसरपणा आणि खाज सुटते. यावर घरात असलेल्या काही साध्या गोष्टी जसे की बर्फ, बेकिंग सोडा किंवा ॲपल सायडर व्हिनेगर काही मिनिटांत वेदना आणि सूज कमी करतात.
जर तुम्हाला मधमाशी चावलह असेल तर प्रथम ते भाग थंड करणे महत्त्वाचे आहे.
यासाठी बर्फाचा तुकडा स्वच्छ कपड्यात गुंडाळून डंख झालेल्या भागावर हलक्या हाताने दाबल्यास सूज, वेदना कमी होते.
तसेच एक चमचा बेकिंग सोडा घेऊन त्यामध्ये थोडेसे पाणी मिसळून पेस्ट बनवा.
चावलेल्या भागावर ते लावून 15 मिनिटानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवावे.
यातील ॲपल सायडर व्हिनेगरदेखील मधमाशीच्या डंखांवर खूप प्रभावी असते.
त्यात असलेले ॲसिटिक ॲसिड डंखाचे विष कमी करते आणि वेदना कमी करते.
ॲपल सायडर व्हिनेगरमध्ये कापसाचा गोळा भिजवा आणि 10 ते 15 मिनिटे प्रभावित भागावर ठेवल्यास सूज आणि चिडचिड या दोन्हीपासून आराम मिळतो.