Jantar Mantar 2.0 Security: जंतर मंतरवर पुन्हा एकदा कॉकरोज जनता पार्टीने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. १० ऑक्टोबरपासून या आंदोलनाला सुरूवात होत असून यावेळीच्या आंदोलनातील मागणी अन् येणारी गर्दी देखील वेगळी आहे. त्यामुळं राजधानीतील पोलीस प्रशासन आणि सुरक्षा दल यांनी विशेष तयारी केली आहे.
दिल्लीत आतापर्यंतची सर्वात मोठी सुरक्षा दलांची डिप्लॉयमेंट झाली आहे. पोलीसांनी माध्यमांना देखील अॅडव्हायजरी जारी केली आहे. त्यांना बॉडी कॅमेरा वापरण्याचा सल्ला दिला आहे. दिल्ली पोलीसांवर महिला पत्रकारांशी गैरवर्तन केल्याचा आरोप झाला होता.
दोन महिन्यापूर्वी शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करत आंदोलन झाले होते. त्यावेळी नीटचा पेपर फुटी प्रकरणी आंदोलन झालं होतं. मात्र आता मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा ही मुख्य मागणी आहे. त्यामुळं यावेळीचे जंतर मंतरवरील आंदोलन वेगळं असणार आहे. म्हणूनच डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिल्ली भेटीवेळी जेवढी सुरक्षा नव्हती त्यापेक्षाही जास्त सुरक्षा यावेळीच्या जंतर मंतर २.० च्या आंदोलनावेळी असणार आहे.त
दिल्लीत जवळपास सीएपीएफचे २६ हजार जवान हे दिल्ली पोलिसांच्या सोबत काम करणार आहे. ही डिप्लॉयमेंट २०२० च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्व भूमीवर आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्ली भेटीवर असताना असलेल्या सुरक्षेपेक्षा जास्त आहे.
हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाने किमान ११० अतिरिक्त सीएपीएफ, सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी, आयटीबीपी आणि सीआयएसएफ च्या तुकड्यांच्या तैनातीला परवानगी दिली आहे. या कंपनी जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमधून आल्या आहेत.
१११ तुकड्या आधीच दिल्लीत दाखल झाल्या होत्या. एका सीएपीफ कंपनीत १२० ते १३० जवान असतात. त्यातील ७५ ते ८० जवान डिप्लॉय केले आहेत. सर्व २२१ तुकड्या या दिल्ली पोलिसांसोबत ऑपरेट करणार आहेत.