Jamui Viral Video Pudhari
राष्ट्रीय

Viral Video: रात्री अल्पवयीन जोडप्याला घेरलं, आक्षेपार्ह वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल; पोलीस Action Mode मध्ये, तीन विकृत ताब्यात

Jamui Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, एका जोडप्याला काही जणांनी घेरून त्रास दिल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.

Rahul Shelke

Jamui Viral Video:

पाटणा : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिहारमध्ये एका जोडप्याला त्रास दिल्याची घटना घडली आहे. व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळी काही मुलं या जोडप्याला घेरताना दिसत आहे. या विकृत मानसिकतेच्या मुलांनी पीडित मुलीसोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याचे कॅमेऱ्यात कैद झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अखेर या व्हायरल व्हिडिओची देखल घेत प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओतील तीन आरोपींची ओळखही पटल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय दिसतं?

व्हायरल झालेल्या फुटेजमध्ये तरुण आणि तरुणीला काही लोकांच्या समूहाने घेरलेले दिसत आहे. काही जण त्यांच्याशी वाद घालत असल्याचे दिसून येत आहे. या गोंधळादरम्यान तरुणाला तरुणीपासून वेगळे केले जात असल्याचेही दिसत आहे.

याचवेळी चेहरा झाकलेली व्यक्ती तरुणीजवळ जाते आणि तिला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. तरुणी मदतीसाठी ओरडताना आणि विरोध करताना दिसत आहे. तरुणही हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

काही वेळानंतर हे दोघे त्या ठिकाणाहून निघून जात असल्याचे दिसते. याशिवाय आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असून, त्यामध्ये हेच जोडपे स्कूटरवरून जात असताना पुन्हा काही जण त्यांना अडवत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर त्यांच्यात वाद होतो आणि अखेरीस जोडपे त्या ठिकाणाहून निघून जाते.

सोशल मीडियावर संताप; पोलिसांकडे कारवाईची मागणी

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तींची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

काही सोशल मीडिया पोस्टमध्ये बिहार पोलिसांसह जमुई पोलिसांना टॅग करून या घटनेची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बिहार पोलिसांनी घेतली दखल

व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आल्यानंतर बिहार पोलिसांनीही त्याची दखल घेतली आहे. बिहार पोलिसांच्या अधिकृत X अकाउंटवरून जमुई पोलिसांना टॅग करत या घटनेची चौकशी करुन कारवाई करा असे सांगण्यात आले.

यामुळे हा व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास आल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, याचा अर्थ व्हिडिओमध्ये दाखवलेली घटना निश्चितपणे जमुईमध्येच घडली आहे, असे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही.

व्हायरल व्हिडिओ जमुईचा

व्हायरल व्हिडिओ हा बिहारमधील जमुईचा असल्याचे उघड झाले आहे. व्हिडिओतील मुलगा - मुलगी दोघेही अल्पवयीन आहेत. महिला आयोग आणि बिहार पोलिसांनी व्हिडिओची देखल घेतली आहे. पोलीस तपासानुसार ही घटना 19 सप्टेंबरची आहे. पीडित जोडपं हे दुचाकीवरुन घरी जात असताना त्यांना सहा ते सात स्थानिकांनी अडवले आणि त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन केले. यातील तीन जणांची ओळख पटवण्यात यश आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT