Chatron Ki Goonj controversy : 'आई हा राजकारणाचा विषय नाही': PM मोदींची नक्कल केल्याप्रकरणी भाजपचा राहुल गांधींवर हल्‍लाबोल

भाजप - काँग्रेस इंदूरमधील 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावरुन आमने -सामने
Chatron Ki Goonj controversy
इंदूरमध्ये शनिवारी (लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संबोधित केलेल्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे.Pudhari
Published on
Updated on

Rahul Gandhi PM Modi mimicry controversy : इंदूरमध्ये शनिवारी (दि. १९ सप्‍टेंबर) लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संबोधित केलेल्या 'छात्रों की गूंज' कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमात राहुल गांधी व्‍यासपीठावर असताना स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एका वृद्ध महिलेमधील संवादाची नक्कल केली. यावेळी राहुल गांधींनी त्यावर टिप्पणी करत पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. यावरुन भाजपने 'आई हा राजकारणाचा विषय नाही', अशी सोशल मीडियावर पोस्‍ट करत राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.

भाजप काय म्‍हणाले?

भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, कॉमेडियन पुलकित हे मोदींची परदेशी नेत्यांशी बोलण्याची शैली हुबेहूब सादर करताना दिसत आहेत. त्यांच्या या सादरीकरणात पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरण आणि एका रॅलीदरम्यान घडलेल्या त्या घटनेचाही संदर्भ होता, जिथे मोदींनी आपले भाषण थांबवून गर्दीतील एका वृद्ध महिलेसाठी खुर्ची देण्याची सूचना केली होती. पुलकित यांनी त्या घटनेचा उल्लेख केल्यावर गांधी हसताना दिसले. "एकीकडे पंतप्रधान मोदींनी एका वृद्ध मातेला आदर आणि प्रेम दिले, तर दुसरीकडे राहुल गांधींनी आपल्या कार्यक्रमात तिची थट्टा केली," असे भाजपने 'एक्स' (X) वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.

Chatron Ki Goonj controversy
Rahul Gandhi | महिला सुरक्षेची जबाबदारी कोणाची? अल्पवयीन मुलीवरील बलात्कार-हत्येप्रकरणी राहुल गांधींची अमित शाह यांच्यावर टीका!

भाजप -काँग्रेसमध्‍ये आरोप प्रत्‍यारोप

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी आज 'एक्स' (X) वर पोस्ट करत म्हटले की, "काँग्रेस पक्ष आता विनोदी कलाकार आणि विदूषकांचा पक्ष बनला आहे. ते कायमचे संपले आहेत... त्यांना श्रद्धांजली (Rest in peace)." दुसरीकडे, काँग्रेसने भाजप आणि आरएसएसवर शिक्षण व्यवस्था पोकळ आणि भ्रष्ट केल्याचा आरोप केला. पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, "राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि म्हणूनच ते सरकारला प्रश्न विचारतात व उत्तरदायित्वाची मागणी करत आहेत."

Pudhari

मूलभूत मानवी संवेदनशीलता अभाव : शिक्षणमंत्री प्रल्‍हाद जोशी

शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले, "राहुल आणि काँग्रेस पक्ष नैतिक अध:पतनाच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या कार्यक्रमाचा वापर करून पंतप्रधान मोदींच्या दिवंगत मातेची थट्टा करणे आणि अपमान करणे, हे मूलभूत मानवी संवेदनशीलता आणि राजकीय संस्कृतीचा धक्कादायक अभाव दर्शवते."

Pudhari

सरकारकडे दिवे लावण्यासाठी पैसे आहेत, पण वसतिगृहांसाठी नाहीत: राहुल गांधी

कार्यक्रमाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी 'एक्स'वरील एका पोस्टमध्ये वसतिगृह सुविधांच्या अभावाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्‍यांनी आपल्‍या एक्‍स पोस्‍टमध्‍ये लिहिलं आहे की, "काल इंदूरमध्ये एका विद्यार्थिनीने मला विचारले: 'सरकारकडे दिवे लावण्यासाठी पैसे आहेत, मग आमच्या वसतिगृहांसाठी का नाहीत?'". शिक्षणासाठी गावांतून शहरात येणाऱ्या विद्यार्थिनींना वसतिगृहे उपलब्ध नसल्यास 'पीजी' (पेईंग गेस्ट) मध्ये राहण्यास भाग पाडले जाते. भाडे आणि सुरक्षित निवाऱ्याचा खर्च इतका जास्त असतो की अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट सुटते."

Chatron Ki Goonj controversy
PM Narendra Modi : सेमीकंडक्टर उत्पादनाचे भारत जागतिक केंद्र

राहुल यांनी विद्यार्थ्यांशी केली शिक्षण आणि रोजगारा मुद्द्यांवर चर्चा

शनिवारी राहुल गांधी यांनी इंदूरमध्ये 'छात्रों की गूंज' या कार्यक्रमाच्या पाचव्या आवृत्तीत सहभाग घेतला. या कार्यक्रमाचा विषय 'व्यवस्था विरुद्ध विद्यार्थी' असा होता. हा कार्यक्रम यापूर्वी कोटा, डेहराडून, प्रयागराज आणि पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. इंदूरमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षण, भरती प्रक्रिया, परीक्षा, आरक्षण, वसतिगृह आणि रोजगार यांशी संबंधित मुद्दे मांडले. एका विद्यार्थिनीने सरकारी परीक्षा उत्तीर्ण होऊनही ओबीसी आरक्षणाशी संबंधित कायदेशीर प्रक्रियेमुळे नियुक्त्या रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच, एका विद्यार्थ्याने एमपीपीएससी (MPPSC) मधील कथित अनियमिततेविरुद्ध आवाज उठवल्यामुळे स्वतःला आणि इतरांना भोगाव्या लागणाऱ्या परिणामांबद्दल माहिती दिली. आदिवासी विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील निवास आणि इतर सुविधांच्या अभावाबाबतचे मुद्दे मांडले. या कार्यक्रमादरम्यान शिक्षक भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या आंदोलनाचा विषयही उपस्थित करण्यात आला. यावेळी राहुल यांनी त्यांच्या चळवळीला पाठिंबा दर्शविला. राहुल यांनी स्पष्ट केले की, "शिक्षण मुलांचा अधिकार असून ती काही सरकारची मेहरबानी किंवा केवळ एक सुविधा नाही."

Chatron Ki Goonj controversy
PM Modi BRICS Summit 2026 : जगात तणाव झपाट्याने वाढतोय, सामान्य माणसांवर गंभीर परिणाम; ब्रिक्स परिषदेत PM मोदींचे प्रतिपादन

कार्यक्रमादरम्यान स्टँड-अप कॉमेडियनने केली PM मोदींची नक्कल

स्टँड-अप कॉमेडियन पुलकित मणी याने कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या देहबोलीची आणि बोलण्याच्या शैलीची नक्कल केली. यावेळी राहुल गांधी त्याला साथ देत हसताना दिसले. राहुल यांनी पुलकितचे स्वागत करताना म्हटले, "कसे आहात मोदी जी? तुम्हाला भेटून आनंद झाला. मला आणखी काही सांगा." पुलकितने अशी काही वाक्ये बोलली जी पंतप्रधानांच्या नक्कलीसारखी वाटत होती. या कार्यक्रमाचा व्हिडिओ काँग्रेस पक्षाच्या 'एक्स' (X) हँडलवर शेअर करण्यात आला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news