Bhimrao Panchale : ‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला’ : भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी दिल्लीत रंगली सुरेल मैफल!

१८ वर्षांनी पुन्हा आलो, आनंददायी अनुभव - भीमराव पांचाळे, महाराष्ट्र सदन येथे सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन
Bhimrao Panchale
गझलनवाझ भीमराव पांचाळे
Published on
Updated on

नवी दिल्ली : गझलनवाझ भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या प्रदीर्घ प्रवासाची झलक देणाऱ्या ' जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला, ‘अंदाज आरशाचा’, ‘तू नभातले तारे माळलेस का तेव्हा’, ‘गरिबाच्या लग्नाला’ यांसारख्या गझला दिल्लीत गायल्या गेल्या आणि श्रोते मंत्रमुग्ध झाले. महाराष्ट्र सदन येथे सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने शनिवारी रात्री गझलनवाझ पंडित भीमराव पांचाळे आणि डॉ. भाग्यश्री पांचाळे यांच्या गझल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

भीमराव पांचाळे यांच्या भावपूर्ण आणि आशयप्रधान गायकीसह डॉ. भाग्यश्री पांचाळे यांनी सादर केलेल्या ‘स्वप्नांचे वय सोळा’ या गझलेने मैफिलीला विशेष रंगत आणली. त्यांच्यासह बासरी वादक प्रशांत अग्निहोत्री, तबलावादक डॉ. देवेंद्र यादव, हार्मोनियम वादक श्रीकांत पिसे, निवेदक किशोर बळी यांचीही खास जुगलबंदी पाहायला मिळाली.

दिल्लीतील गझलप्रेमी रसिकांनी या सांगीतिक मैफिलीचा आनंद घेतला आणि भरभरून दाद दिली. कार्यक्रमात सादर झालेल्या गझलांनी रसिकांना भावविश्वात रमवून ठेवले. तब्बल १८ वर्षांनी पुन्हा एकदा दिल्लीत कार्यक्रम झाला आणि रसिकांनी त्याला भरभरून दाद दिली हे आनंददायी असल्याचे भीमराव पांचाळे ‘पुढारी’शी बोलताना म्हणाले. 

कार्यक्रमाला सदनाच्या निवासी आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी अय्याज तांबोळी, महेश जिवडे, चिन्मय गोतमारे, ज्येष्ठ पत्रकार अभिजित कांबळे, महाराष्ट्र सदनाचे सहाय्यक आयुक नितीन शेंडे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे माहिती संचालक हेमराज बागुल, जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे, सदन व्यवस्थापक प्रमोद कोळपते, लेखा अधिकारी नीलेश केदारे उपस्थित होते. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news