Darjeeling Honeymoon Tragedy : हनिमूनचा आनंद क्षणात भस्मसात: दार्जिलिंगमध्ये बारबेक्यूचा भडका, नवविवाहिता गंभीर भाजली

या घटनेप्रकरणी होमस्टे व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल
Darjeeling Honeymoon Tragedy
Published on
Updated on

दार्जिलिंग : पश्चिम बंगालमधील एका नवविवाहित दांपत्याच्या आनंददायी हनिमून सहलीचा शेवट एका दुर्दैवी आणि भीषण अपघातात झाला. दार्जिलिंगमधील प्रसिद्ध सिट्टॉन्ग परिसरातील एका होमस्टेमध्ये बारबेक्यू सुरू असताना अचानक भडकलेल्या आगीत नवविवाहिता गंभीररीत्या होरपळली. या घटनेत निकिता दास असे नाव असलेली ही तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर सिलिगुडी येथील एका खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेप्रकरणी होमस्टे व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाविरोधात पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला असून, घटनेचे अंगावर काटा आणणारे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या निकिता आणि तिचा पती सौविक यांचा विवाह अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच झाला होता. वैवाहिक जीवनाची नवी सुरुवात साजरी करण्यासाठी हे दांपत्य सिट्टॉन्ग या निसर्गरम्य डोंगरी भागात हनिमूनसाठी आले होते. १३ सप्टेंबरच्या रात्री या होमस्टेच्या आवारात पर्यटकांसाठी बारबेक्यूचे आयोजन करण्यात आले होते.

Darjeeling Honeymoon Tragedy
TMC New Party Symbol : तृणमूल काँग्रेसचं नाव बदललं! दोन्‍ही गटांना मिळालं नवं नाव अन् नवं चिन्‍ह

व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजनुसार, निकिता आणि तिचा पती बारबेक्यू शेगडीजवळ बसलेले दिसत आहेत. तेवढ्यात समोरून आलेल्या एका व्यक्तीने आगीची तीव्रता वाढवण्यासाठी कॅनमधून काही ज्वलनशील द्रव ओतण्याचा प्रयत्न केला. द्रव ओतताच क्षणात आगीचा मोठा भडका उडाला आणि आगीच्या प्रचंड ज्वाला थेट निकिताच्या अंगावर गेल्या.

आगीच्या विळख्यात सापडल्याने निकिता जागीच कोसळली. या अनपेक्षित प्रकारामुळे तिथे एकच धावपळ आणि घबराट उडाली. पती सौविकने तात्काळ निकिताच्या दिशेने धाव घेत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर संबंधित कर्मचाऱ्याने अंगातील टी-शर्ट काढून निकिताच्या अंगावरील आग विझवण्याचा आटापिटा केला.

Darjeeling Honeymoon Tragedy
Nithari Case Surinder Koli : देशाला हादरवून सोडणाऱ्या 'निठारी हत्याकांडा'तील सुरेंद्र कोळीने हरिद्वारमध्ये संपवले जीवन

या दुर्घटनेत निकिताच्या शरीराचा बहुतांश भाग गंभीररीत्या भाजला आहे. घटनेनंतर तिला तात्काळ नजीकच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र प्रकृती अधिक खालावल्याने तिला पुढील उपचारांसाठी सिलिगुडी येथील खासगी नर्सिंग होममध्ये हलवण्यात आले असून तिची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

Darjeeling Honeymoon Tragedy
Hit and Run case : बेदरकारपणाचा कळस! ७३ वर्षीय कार चालक सुसाट! बाईकला धडक देत अर्धा किलोमीटरपर्यंत नेले फरफटत!

दरम्यान, पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी होमस्टे प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. दुर्घटना घडल्यानंतर व्यवस्थापनाने तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात अथवा आपत्कालीन व्यवस्था करण्यात अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. तथापि, या आरोपांसंदर्भात होमस्टे व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान, बारबेक्यूच्या वेळी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात होती का आणि होमस्टे व्यवस्थापनाकडून कोणती सुरक्षा व्यवस्था ठेवली होती का? या सर्व बाबींचा पोलीस तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news