Indore Water Contamination: देशातील सर्वात स्वच्छ शहर अशी ओळख मिळवणाऱ्या इंदौरमध्ये एक मोठी घटना घडली. विषारी पाणी पिल्यामुळं जवळपास १४०० लोकांची प्रकृती बिघडली असून आतापर्यंत त्यातील ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. जवळपास ३२ रूग्ण हे अतीदक्षता विभागात दाखल आहे.
दरम्यान इंदौरमधील बागीरथपुरामध्ये प्रदुषित पाण्यामुळं ही एवढी मोठी आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. इंदौरचे वरिष्ठ वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी डॉक्टर माधव प्रसाद हसानी यांनी एका न्यूज एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार शहराच्या मेडिकल कॉलेजद्वारे करण्यात आलेल्या लॅब टेस्टमध्ये भागीपथपुरा भागातील एका पाईपलाईन लिकेजमुळं पाणी प्रदुषित आणि विषारी झाले.
भागीरथपुराच्या एका पोलीस चौकीतजवळील पाणी पुरवठा करणारी मुख्य पुरवठा पाईपलाईनमध्ये अशी ठिकाणी गळती सापडली जिथं एक शौचालय बनवण्यात आलं होतं. डॉक्टर माधव यांनी दावा केला आहे की या लिकेजमुळेच या भागातील पाणी दुषित झाले होते.
अतिरिक्त मुख्य सचिव संजय दुबे यांनी पत्रकारांना सांगितलं की, आम्ही भागीरथपुरा येथील पिण्याच्या पाण्याच्या सप्लाई पाईपलाईनची बारकाईने तपासणी करत आहोत. आम्हाला अजून कुठे लिकेज तर नाही ना याचा देखील शोध घ्यायचा आहे.
त्यांनी सांगितलं की तपासानंतर गुरूवारी भागीरथपुरामधील घरांमध्ये पाईपलाईनद्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा केला गेला. मात्र लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून पिण्याचा सल्ला दिला आहे.
भागीरथपुरा इथल्या दुषित पाणी प्रकरणानंतर आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार करून ती जारी करण्यात येणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या निर्देशानंतर दुबे यांनी भागीरथपुराचा दौरा करत परिस्थितीचा आढावा घेतला.
आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने गुरूवारी भागीरथपुरामधील १७१४ घरांचा सर्वे करण्यात आला. त्यावेळी ८५७१ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ३३८ लोकांना उल्टी-अतीसाराची सौम्य लक्षणे दिसली. त्यांना घरातच प्राथमिक उपचार देण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले की, आजार पसरल्यानंतर आठ दिवसात २७२ रूग्णांना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यातील ७१ लोकांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्याच्या घडीला २०१ रूग्ण रूग्णालयात दाखल आहेत. त्यातील ३२ रूग्ण आयसीयूमध्ये आहेत.